देशविदेश

सदर बाजार पोलिसांचा जन्ना मन्ना जुगारावर छापा

सहा जणांना घेतले ताब्यात

जालना न्यूज प्रतिनिधी:- गुरुवारी दोन वाजेच्या सुमारास लालबाग जालना येथे काही लोक जमावबंदीचा आदेश झुगारून जन्ना मन्ना नावाचा जुगार खेळ खेळत असल्याची माहिती सदर बाजार पोलिसांना मिळाल्या वरून सदरची माहिती वरिष्ठांना कळवून त्यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गजानन कौळासे पोलीस हेडकॉन्स्टेबल परशुराम पवार पो ना शिरसाट दांडगे बेराड अशा पथकाने लालबाग येथे जाऊन जुगार खेळणारे १) सोनू यशवंत साळवे २) किशोर लिंबाजी कदम ३)शेख कलीम शेख हुसेन ४) शेख लियास शेख फारुख ५) शेख जावेद शेख रहमत६) शेख हनीफ शेख सलीम सर्व राहणार लालबाग जालना यांचेवर छापा मारून पंचनामा करून त्यांच्या ताब्यातून जुगार साहित्य व नगदी अकराशे रुपये जप्त करून त्यांचे विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच कोरोना महामारी विषाणू बिमारी पसरविण्याचा हलगर्जीपणा या सदराखाली व जुगार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तपास पोना पवार हे करीत आहेत सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक श्री एस चैतन्य, साहेब मा.अप्पर पोलीस अधीक्षक श्री समाधान पवार उप विभागीय पोलिस अधिकारी श्री सुधीर खिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री संजय देशमुख पोलीस उपनिरीक्षक गजानन कौळासे पोलीस हेडकॉन्स्टेबल श्री परशुराम पवार पोलीस नाईक शिरसाट,बेराड, दांडगे आदींनी केली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक