जालना तालुका

ब्राम्हणखेडातील मोसंबी उत्पादक आले संकटात

सिंधीकाळेगाव न्यूज (प्रतिनिधी)

लॉकडाउनमुळे मोसंबी शेतकरी अडचणीत
कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातलं आहे .कोरोना विषाणूमुळे भारत सुध्या सध्या लॉकडाउन आहे याचाच फटका मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना बसताना दिसत आहे
जालना तालुक्यातील ब्राम्हणखेडा गावातील मोसंबी उत्पादक शेतकरी लॉकडाउन मुळे अडचणीत सापडले आहे . तब्बल ६०० मोसंबी च्या झाडाची मोसंबी शेतातच तोडून टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे
६०० मोसंबीच्या झाडाला तब्बल ५० हजार (पन्नास हजार)इतका यावर्षी खर्च आला आहे .आणि लॉकडाउन मोसंबी शेतातच तोडून टाकण्याची आमच्यावर वेळ आली आहे ह्याच बागेत दरवर्षी दोन ते तीन लाख एवढं उत्पन्न आम्ही घेत असतो पण या वर्षी मात्र ऐन मोसंबी विक्रीच्या वेळेस कोरोना या रोगामुळे देशामध्ये लॉकडाउन त्यामुळे मोसंबी नाईलाजाने शेतातच तोडून टाकावी लागत आहे यामुळे आम्हाला खूप मोठा आर्थिक अडचण निर्माण झाली आहे मोसंबी नेमक्याच बाजारात घेऊन जान्याच्या अवस्थेत आल्या आणि कोरोणाच्या वायरसचा प्रादर्भाव रोकण्यासाठी लाँकडाऊन करण्यात आले. मोसंबी उन्हात तळुन पिवळ्या पडत असुन सुकल्यामुळे गळुन पडत आहे. शेतकर्यांचे लाखो रूपयाचे नुकसान होत असुन लावलेला खर्च देखील निघाला नसुन फक्त नुकसानच हकेली. लागत आहे.
अशी माहिती ब्राम्हणखेड येथील शेतकरी किसनराव डवले यांनी दिली त्याच बरोबर सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशीही भावना यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली. जालना तालुक्यातील बाजीउम्रद परिसरात अशा प्रकारे मोसंबीचे लाँकडाऊन मुळे नुकसान झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक