घनसावंगी तालुका

रांजणीत भरला आठवडी बाजारसोशल डिस्टन्सचा फज्जा


रांजणी न्युज/असलम कुरेशी
घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथे लाॅकडाऊन असतानाही शुक्रवारी आठवडी बाजार भरला. विशेष म्हणजे या बाजारात सोशल डिस्टन्सचे मात्र तीन तेरा वाजल्याचे दिसून आले.
देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाॅकडाऊनची घोषणा केलेली आहे. तसेच जिल्हा प्रशासनाने जमावबंदी आदेश लागू करुन फक्त किराणा, दवाखाने, मेडिकल, दूध व काही मोजक्या भाजीपाल्याची दुकाने लावण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. शासन व प्रशासनाच्या या निर्णयाची अमलबजावणी करण्यासाठी पोलिस, तलाठी, ग्रामपंचायत व पत्रकार परिश्रम घेत आहेत. भाजीपाल्याचे व्यापारी, शेतकरी व ग्राहकांना पोलिस व ग्रामपंचायतच्या वतीने वेळोवेळी सोशल डिस्टन्सचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहेत. परंतु ग्राहक व व्यापा-याकडून सोशल डिस्टन्सचे पालन होताना दिसत नाही. विशेष म्हणजे ग्रामपंचायत व पोलिसांनी मोजकी दुकाने लावण्याच्या सूचना केलेल्या असतानाही शुक्रवारी येथे मोठ्या प्रमाणात आठवडी बाजार भरला. तसेच या बाजारात दुकानासमोर कोणत्याही प्रकारची मार्किंग केलेली दिसत नव्हती. अनेक ग्राहक व दुकानदारांना मास्क नव्हते. तसेच सोशल डिस्टन्सचा बोजवारा उडालेला दिसत होता. बाजारात शिस्त व सोशल डिस्टन्सचे पालन करण्यासाठी पोलिस जमादार जी.जी. मदन, विनोद देशमाने, सरपंच राधाकिसन जाधव, भारत देवकर, ज्ञानेश्वर आढाव, राधाकिसन शिंगणे आदी परिश्रम घेत आहेत. मात्र तरीही नागरिकच सोशल डिस्टन्सचे पालन करत नसल्याचे दिसत आहे. रांजणी येथील बाजारात परिसरातील 30 ते 35 गावातील शेकडो नागरिक येत असतात. कदाचित एखादा कोरोनाचा रुग्ण या बाजारात येऊन गेला तर यामुळे शेकडो नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक