जालना जिल्ह्यातील ह्या तालुक्यात आज 5 लाखांचा गुटखा केला पोलिसांनी जप्त
कर्नाटकातून अवैधरित्या विक्रीसाठी आलेला गुटखा परतूर पोलिसांनी पकडला
परतूर /दीपक हिवाळे
4 लाखांची 80 हजाराचा गुटखा आणि पाच लाखाचा आयशर ट्रक, असा 9 लाख 80 हजाराचा मुद्देमाल जप्त
परतूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे कर्मचाऱ्यांसह परतुर ते वाटुर रोडवर मध्यरात्री नाकाबंदी आणि कोंबिंग ऑपरेशन करीत असताना त्यांना एक आयशर वाहन (एमएच-43, वाय-0044) संशयास्पदरीत्या भरधाव जाताना दिसले. ह्या आयशर वाहनाला थांबवून त्याची झाडा-झडती घेतली असता, त्यामध्ये गोवा, वजीर या प्रतिबंधित गुटख्याच्या 24 मोठ्या गोण्या आढळून आल्या आहेत.प्रत्येक गोणीची 20 हजार रुपये किंमत याप्रमाणे एकूण चार लाख 80 हजार रुपयांचा हा गुटखा आहे. पोलिसांनी हा गुटखा आणि पाच लाख रुपयांचे आयशर वाहन जप्त केले आहे. आयशरचालक अक्रम पाशा गालिब पाशा (वय 25, रा. कावेरीनगर, बेंगलोर, कर्नाटक) यास ताब्यात घेतले आहे. हा गुटखा कर्नाटकातील बिदर येथून मंठा शहरातील एका अवैध गुटखा विक्रेत्याकडे जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. परतूरचे पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक कमलाकर अंभोरे, श्री. वाघ, पोलीस कर्मचारी पाऊलबुद्धे, राठोड, गोपनवाड आदींनी ही कामगिरी केली आहे. याप्रकरणी पुढील कारवाई करण्यासाठी जालना येथील अन्न व औषधी प्रशासन विभागास कळविण्यात आले आहे.