Breaking News
देशविदेश

सर्कस मध्ये काम करणाऱ्याचा विहरीत तोल जाऊन मृत्यू


अंबड न्यूज :-
जालना बीड रस्त्यावर अंबड च्या जवळ राहत असलेले सर्कस खेळ दाखविण्यारे कुटुंब लॉकडाऊन मुळे मागील दोन महिन्यांपासून राहत होते . मोसंबी मार्केट जवळील विहिरीत पाणी काढता काढता तोल जाऊन एकाचा दुर्दैवी अंत झाला.सय्यद जावेद सय्यद बशीर असे मृत व्यक्तीचे नाव असून हा मागील दोन महिन्या पासून त्याच व त्याच्या कुटुंबाचे फेडरेशन जवळ वास्तवास होते. सय्यद कुटुंब आपले जीवन गावोगावी जाउन सर्कशीचा खेळ करून उदरनिर्वाह चालवत असे. जावेद हा कुटुंबातील एकमेव कमवता वेक्ती होता मोठा मुलगा गेल्याने सय्यद कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मागील महिन्याभरा पासून लॉकडाऊन
असल्याने सय्यद कुटुंब झोपडीत राहून आपले जीवन चालवत असे जावेद यांच्या पश्चात आई दोन लहान भाऊ दोन लहान बहीण असा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक