जालना जिल्हा

जालना शहरात निर्जंतुकीकरण मोहीम


जालना ( प्रतिनिधी न्यूज ) : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नगर पालिकेच्या वतीने जालना शहरात वेगवान रितीने निर्जंतुकीकरण मोहीम राबविली जात आहे. शुक्रवारी कोरोना विलगीकरण कक्षासह अधिकारी निवासस्थाने व शासकीय कार्यालये परिसरात सॅनिटाइजर फवारणी करण्यात आली.यावेळी
नगर पालिकेच्या वतीने कोरोना विलगीकरण कक्ष परिसरासह शहरात निर्जंतुकीकरण मोहीम राबविण्यात आली. फवारणी करतांना स्वच्छता निरिक्षक अरूण वानखेडे, विठ्ठल गोगरूड, श्रावण सराटे, आदी उपस्थित होते
जालना शहरातील प्रीतीसुधा नगर , म्हाडा कॉलनी येथे आमदार कैलाश गोरंट्याल, नगरअध्यक्षा सौ.संगीताताई गोरंट्याल यांनी स्वतः लक्ष देत अग्निशमन दलाच्या सहकार्याने संपूर्ण परिसरात जंतूनाशक फवारणी करून घेतली .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक