Breaking News
घनसावंगी तालुका

रमजान महिन्यात शासनाच्या आदेशाचे पालन करावे-हा.अ.रहिम

न्यूज

रांजणी प्रतिनिधी/असलम कुरेशी
कोरोना व्हायरसच्या महासंकटाचा सामना करण्यासाठी शासनाने लाॅकडाऊनची घोषणा करुन जमावबंदी आदेश लागू केलेला आहे. त्यामुळे मुस्लिम बांधवानी शासनाच्या आदेशाचे पालन करुन घरातच नमाज अदा करण्याचे आवाहन हाफिज अब्दुल रहिम यांनी केले.
यासंदर्भात रांजणी येथील जामा मशिदीचे इमाम हाफिज अब्दुल रहिम म्हणाले की प्रत्येक वर्षाप्रमाणे याही वर्षी अल्लाहने आम्हाला रमजान महिन्यात रोजे व नमाज अदा करण्याची संधी दिली, हीच आमच्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. आज संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून या व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लाॅकडाऊनची घोषणा केलेली आहे. तसेच जिल्हा प्रशासनाने जमावबंदी आदेश लागू केलेला आहे. त्यामुळे सर्व मुस्लिम बांधवांनी शासन व प्रशासनाच्या आदेशाचे पालन करुन स्वतःच्या घरातच नमाज अदा करावी. तसेच घरामध्ये कुरआनचे पठन करून आपल्या राज्याची व देशाची कोरोनाच्या संकटातून मुक्तीसाठी प्रार्थना करावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक