Breaking News
देशविदेश

गांजा वाहतूक करताना एकाला पकडले :पन्नास हजाराचा गांजा जप्त

लॉकडाऊनच्या काळात ४६ हजाराचा रुपयांचा मुद्देमाल जप्त टेम्भुर्णी पोलिसांची धडाकेबाज कारवाई 
अकोलादेव, न्युज बि. डी. सवडे :- जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथे लॉकडाऊनच्या काळात गांजा वाहतूक करणाऱ्याला पोलिसांनी पकडून ४६ हजार १०० रु चा गांजा जप्त केला तर याबाबत टेम्भुर्णी पोलिसांत एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी किसन मंडलकर रा देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा  हा अंमली पदार्थ गांजा ची चोरटी विक्री करण्यासाठी घेऊन जाणार आहे अशी माहिती खबऱ्या मार्फत टेम्भुर्णीचे सपोनि ज्ञानेश्वर पायघन यांना मिळाली त्यानी लगेच महसूल विभागाचे नायब तहसीलदार डकले  व दोन पंच विनोंद मेन्द्रे व कृषी विभागाचे अरुण भदर्गे यांच्या सह सापळा लावून छापा कारवाई करून  स्थानिक टेम्भुर्णी शहरात जुने बसस्टँड परिसरात अवैध  गांजा मोटर सायकल वर वाहतूक करून घेऊन जात असताना इसम किसन आनंदा मंडलकर रा देऊळगाव राजा याच्या ताब्यातून एकून ४६१०० रुपयाचा  गांजा व मोटर सायकल  असा मुद्देमाल जप्त केला आहे इसम किसन मंडलकर व त्याचा साथीदार शेख समद रा टेम्भुर्णी यांच्यावर  गुन्हे नोंद केले आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक एस चैतन्य, अप्पर पो. अधीक्षक समाधान पवार,  उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि. ज्ञानेश्वर पायघन,  पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर साखळे पो कर्मचारी.गजेंद्र भुतेकर   बळीराम तलपेमहेश वैद्य गणेश पवार सागर शिवरकर गणेश खर्डे मंगेश शिंदे यांनी केली असून पुढील तपास फौजदार ज्ञानेश्वर साखळे करीत आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक