भोकरदन तालुका

भोकरदन तालुक्यातील ३० हेक्टरवरील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना लॉकडाऊनचा  फटका

(पारध न्यूज /भोकरदन तालुका)  लॉकडाउनमुळे  संपूर्ण जग थांबले आसुन कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी शासन विविध प्रयत्न करीत आहे.माञ या लाँकडाऊनमध्ये शेतकऱ्यांचे जिवनमान हे शेतीवरच अवलंबून असल्याने   याचा सर्वाधीक मोठा फटका शेतकऱ्यासह फळबाग शेतकऱ्यांना देखील सोसावा लागत आहे.लॉकडाऊनमुळे परजिल्हा व ईतर राज्यातील निर्यात बंद झाली असल्याने व कुठलाही व्यापारी माल उचलण्यास तयार नसल्याने भोकरदन तालुक्यातील जवळजवळ ३० हेक्टरवरील फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे.त्यामुळे तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे.  तालुक्यातील बरजंळा साबळे,नळणी,लिंगेवाडी,थिगळखेडा,खापरखेडा यासह ईतर देखील गावातील अनेक शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागाची शेती करतात.यंदा देखील  जवळजवळ ३० हेक्टरपर्यंत द्राक्ष बाग लागवड करण्यात आली आहे.अवकाळीने नुकसान केलेल्या शेतकऱ्यांनी दुष्काळात देखील मोठा खर्च करुन या बागा जोपासल्या आहे.दरवर्षी परजिल्हा तसेच ईतर राज्यातील व्यापारी हा माल घेऊन जातात. माञ यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले असल्याने यामुळे दळणवळण व्यवस्था ठप्प झाली आहे.त्यामुळे द्राक्ष बागायतदारांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.बरजंळा साबळे येथील शेतकरी अण्णा साबळे  यांनी मागील पाच वर्षापासुन दोन एकरावर द्राक्ष बागेची लागवड केली आहे.त्यामुळे त्यांना दरवर्षी या शेतीतुन लाखोचा फायदा देखील होत आहे.यंदा  सुरूवातीपासुन द्राक्षबागेवर तीन लाख रुपये खर्च करुन मेहनतीवर उत्पादन चांगले आणले माञ कोरोनामुळे अख्खा देशच लॉकडाऊन असल्यामुळे हि द्राक्ष झाडालाच खराब होऊन जमिनीवर गळुन पडू लागली आहे.असे खराब होऊन वाया जाण्यापेक्षा मिळेल तो भावात या शेतकऱ्याने द्राक्ष अनेक गावात जाऊन विक्री केले आहे.शेकडो कॅरेट द्राक्ष जनावरांना देखील खाऊ घातले आहे.विशेष म्हणजे या शेतकऱ्याने आता आपल्या घराच्या छतावर हे द्राक्ष तोंडुन वाळविण्यास सुरूवात केली आहे.जेणेकरुन येणाऱ्या काळात लॉकडाऊन संपल्यानंतर यातुन देखील काही पैसे आपल्या हाती लागतील अशी अपेक्षा या शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.मागील वर्षी अवकाळीने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरवला आहे.हे दुःख विसरत नाही तोच पुन्हा कोरोनाने घात केल्याने  शेतकऱ्यावर मोठी आर्थिक संकटाची कुऱ्हाड  कोसळली आहे.
अण्णा साबळे, द्राक्ष फळबाग शेतकरी, बरजंळा साबळे बारा लाखापर्यत उत्पादन झाले असते यंदा मोठ्या मेहनतीने तीन लाख रुपये खर्च करुन दोन एकरवर द्राक्षाची बाग बहरली होती.जवळजवळ या बागेतुन ४०० क्विंटल माल विक्री झाला असता त्यातुन बारा लाखापर्यंत उत्पन्न निघणे अपेक्षित होते.माञ कोरोनाने आमच्या स्वप्नावर पुरते पाणी फेरले आहे.त्यामुळे मिळेल तो भाव घेऊन काही द्राक्ष विकावी लागली आहे.काही आता छतावर वाळू घातली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक