भोकरदन तालुका

पारध परिसरातील धामणा व जुई धरणाला लागणार महिनाभरात घरघर

मागील वर्षी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने भोकरदन तालुक्यातील पारध परिसरातील धामणा व जुई धरण ओव्हरफ्लो झाले होते.माञ सध्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.त्यातच दोन्ही धरणातुन झपाट्याने पाणी उपसा सुरू असल्याने धरणातील पाणी पातळी खालावत आहे.उत्तर भोकरदनची मदार असलेल्या या दोन्ही धरणात आता महिनाभर पुरेल ऐवढाच पाणीसाठा शिल्लक उरला असल्याने तालुक्यातील जनतेला येणाऱ्या काळात पाणी टंचाईचे चटके सहन करावे लागु शकतात.यासाठी प्रशासनाने गाफील न राहता आतापासुन उपाययोजना करण्याची गरज आहे. भोकरदन तालुक्यातील दानापुर येथील जुई तर शेलुद येथील धामणा धरण हे उत्तर भोकरदन मधील नागरिकांना नेहमी दुष्काळात वरदान ठरले आहे.जवळजवळ या दोन्ही धरणातुन भोकरदन शहरासह तालुक्यातील पन्नास गावाची तहान भागविल्या जाते.२०१८ मध्ये अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने या दोन्ही धरणात जेमतेम पाणी साठा जमा झाला होता.त्यामुळे तालुक्यातील जनतेला भयानक अशा दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागला होता.पाणी टंचाई रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने जवळजवळ ७६ गावात १०० टँकरने पाणी पुरवठा सुर करण्यात आला होता तर १३० च्या जवळपास विहिरीचे अधिग्रहण देखील करण्यात आले होते.तरीही मागील वर्षी पाणी टंचाईला लगाम लावण्यासाठी प्रशासन अपयशी ठरले होते.यंदा माञ मागील वर्षी मोसमी पावसासह परतीच्या पावसाने तालुक्यात धुव्वाधार हजेरी लावल्यामुळे नदी,नाले,विहिरी पाझर तलाव व धरणे ओव्हरफ्लो झाले होते.त्यामुळे यंदा परिस्थिती समाधानकारक दिसुन येत असली तरी सध्या वाढते तापमान व दोन्ही धरणातुन होत असलेला अवैध पाणी उपशामुळे या धरणाची पाणी पातळी झपाट्याने खाली होण्यास सुरूवात होऊ लागली आहे.आजच्या परिस्थितीत धामणा धरणात ४० टक्के तर जुई धरणात ३२ टक्के पाणी साठा शिल्लक आहे.विशेष म्हणजे पाझर तलाव,विहिरीनीं देखील तळ गाठण्यास सुरूवात केली असल्याने अनेक गावात नागरिकांना आता विहिरीवरुन पाणी शेंदून आणावे लागत असल्याचे चिञ निर्माण झाले आहे.धरणातील पाणी जुन पर्यंत पुरेल अशा भ्रमात तालुका प्रशासनाने न राहता पाणी टंचाईच्या दिशेने प्रशासनाने उपाययोजना करणे गरजेचे आहे.सध्या कोरोनामुळे प्रशासन व्यस्त असले तरी पाणी टंचाईकडे देखील प्रशासनाने वेळीच लक्ष घालावे अशी मागणी तालुक्यातील नागरिक करीत आहे.
एस.जी..राठोड, शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग कारवाई सुरू आहे. तालुक्यातील धामणा व जुई धरणात जेमतेम दिड महिना पुरेल ऐवढा पाणीसाठा सध्या उपलब्ध आहे.धामणा धरणावर अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.यापुढे देखील कारवाई सुरूच राहणार आसुन दोन्ही धरणावर पाटबंधारे विभागाचे विशेष लक्ष राहणार आहे.
दरवर्षी वराती मागून घोडे:- भोकरदन तालुक्यात दरवर्षी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे तालुक्यातील जनतेला पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते.दरवर्षी धरणात मुबलक पाणी असल्यावर धरणातुन दिवसा ढवळ्या होत असलेल्या पाणी चोरीकडे दुर्लक्ष केल्या जाते व धरणात पाण्याचा मृतसाठा शिल्लक असल्यावर प्रशासन कारवाई करण्यास समोर येते हे चिञ दरवर्षीचे आहे.यंदा माञ प्रशासनाने वरातीमागुन घोडे न हाणता प्रत्यक्ष कारवाई करुन आतापासुनच धरणातील पाणी राखीव ठेवणे गरजेचे आहे..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक