भोकरदन तालुका

अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्या रद्द करा,

आदिवासी कोळी मल्हार समन्वय समितीची मागणी

images (60)
images (60)

मधुकर सहाने : भोकरदन

राज्यातील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्या या असंविधानीक असून त्या मुद्दामहून प्रमाणपत्र तपासणीत अन्याय करीत असल्याचा आरोप करत उपविभागीय अधिकारी भोकरदन यांना आदिवासी कोळी मल्हार समन्वय समितीच्या वतीने सदरील समित्याच रद्द करण्याची मागणी केली आहे.


याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समित्या या असंवैधानिक असून त्या मुद्दामहून आदिवासी जमातीचे मल्हार कोळी,महादेव कोळी,टोकरे कोळी व इतर 43 प्रकारच्या जमातीवर या समित्या प्रमाणपत्र तपासणीत हेतुपुरस्सर अन्याय करीत असल्याचा निवेदनात आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, याविरुद्ध महाराष्ट्रभर समन्वय समितीच्या वतीने विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी,उपविभागीय अधिकारी,तहसीलदार यांना 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी अस्मिता दिनाचे निमित्त साधून निवेदन देण्यात आले आहे.


त्याचाच एक भाग म्हणून भोकरदन येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयात आदिवासी कोळी मल्हार समन्वय समितीचे जालना जिल्हाध्यक्ष सुभाष पाडळे,समन्वय समितीचे सदस्य अंबादास इंगळे,डी के सोनवणे,के बी चंडोल,एस पी सुरडकर,गजानन इंगळे,संदीप दांडगे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!