परतूर तालुका

परतुर नगरपालिकेने केले दंड वसूली


परतूर न्यूज दीपक हिवाळे
कोरोणा विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता सार्वजनिक स्थळी थुंकणे ,सार्वजनिक स्थळी चेहऱ्यावर मास्क न वापरणे, सोशल डीस्टनशि़गचे नियम न पाळणे ,सार्वजनिक स्थळी विनाकारण फिरणे, इत्यादी गैरकृत्यसाठी दंडनीय आणि फौजदारी कारवाई करण्या सबंधी जिल्हाधिकारी जालना यांनी नगरपालिकेला आदेशित केले असताना त्या अनुषंगाने परतुर नगरपालिकेने दोन पथकाची स्थापना केली त्यामध्ये मोंढा भागाकरिता योगेश काटकर ,चंद्रकांत खनपटे व कल्याण पाठक तर पथक क्र.दोन गावभागामध्ये हरिभाऊ काळे, अतुल देशपांडे व सुरेश आरसुळ यांची नियुक्ती करण्यात आली सोशल डिस्टनशि़ग पालन न करणे, तोंडाला मास्क न लावणे, किराणा दुकानाच्या दर्शनी भागात भाव फलक नसल्यास त्यांना दंड आकारणे याबाबत पथकास आदेशित केले आहे सदर पथकाने नगर परिषद हद्दीतील प्रथम तपासणीस किराणा दुकानदारास भाव फलक अनिवार्य बाबत सर्वांना सूचना दिल्या असुन बहुतांश किराणा दुकानदारांनी याची अंमलबजावणी सुद्धा केलेली आढळून आली .मात्र सोशल डिस्टनसिंग व तोंडाला मास्क वापरणे याबाबत लोकांना सूचना देऊनही उदासीनता पाहता आज दि. 25 /4 रोजी पथक क्र. दोन यांनी दंडात्मक कारवाई करत 10 व्यक्तीकडून तोंडाला मास्क न वापरल्यामुळे एकूण 2000 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यामध्ये शहरात किराणा दुकाना समोर भाव फलक न लावल्यास चढ्या भावाने वस्तू विक्री केल्यास असे निदर्शनास आल्यास व त्या दुकानासमोर सोशल डिस्टनशिंगचे पालन न केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल तसेच जिल्हाधिकारी जालना यांच्या आदेशाचे पालन करीत पोलीस प्रशासनाची मदत घेऊन लॉकडाऊनच्या काळात नियमांचा भंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात करण्यात येतील असे मुख्य अधिकारी परतूर नगर परिषद परंतुर यांनी कळविले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक