घनसावंगी तालुका

रमजान महिन्यावर कोरोनाचे सावट


रांजणी प्रतिनिधी/असलम कुरेशी
मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यावर कोरोनाचे सावट दिसत असून मोठ्या प्रमाणात व्यवसाय चालणारा महिना असतानाही सर्वत्र शुकशुकाट दिसत आहे.
रांजणी येथे दरवर्षी रमजान महिन्यात फळ फ्रुटचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. रांजणी येथे मुस्लिम समाजाची लोकसंख्या निम्मी असल्याने इफ्तारसाठी विविध पदार्थांची खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असते. येथे रमजान महिन्यात केळी, टरबूज, खरबूज, भजी, पेंडखजूरसह सुक्यामेव्याची विक्री मोठ्या प्रमाणात होते. परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनची घोषणा झाल्याने सर्वच कामे बंद पडली आहेत. कामे बंद पडल्याने नागरीकाकडे पैसा येणार कुठून हा महत्वाचा प्रश्न निर्माण झाली आहे. तसेच नागरिकाकडेच पैसा नसल्याने सर्व व्यवसाय अडचणीत आले आहेत. तसेच प्रशासनाने जमावबंदी आदेश लागू केल्याने बाजार पेठेत शुकशुकाट पसरला आहे. त्यामुळे रमजानचा महिना असूनही टरबूज, खरबूज, पेंडखजूर व सुकामेव्याच्या मागणीत मोठ्या प्रमाणात घट पडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक