Breaking News
जालना जिल्हा

जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील कार्यलयाचे सद्यस्थितीत पंचनामे करावे:मनसे


जालना न्यूज
जालना जिल्ह्यातील ८ हि तालुक्यातील १०% अधिकारी – कर्मचार आपल्या कार्यालयात आपल्या कामावर हजर आहेत किंवा नाही, या साठी ८ तालुक्यातील तहसीलदार कार्यालयामार्फत सर्व शासकीय कार्यालयाचे व यांच्या निवासी पंचनामे करावे अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे एका इमेल पत्राव्दारे केली आहे.
जालना जिल्ह्यातील ८ हि तालुक्यातील शासकीय पदावर काम करणारे अधिकारी-कर्मचारी हे औरंगाबाद किंवा ईतर ठिकाणा वरूण जालना जिल्ह्यात आपल्या कार्यालयीन कामा करण्यासाठी अपडाउन करीत आहेत का ? सध्या कोरोना सारख्या साथीच्या रोगांमुळे सरकार – प्रशासन, जनता चिंतेत असताना हे अधिकारी – कर्मचारी मात्र अप डाऊन करण्यात मग्न आहेत का ? खरेतर यांना जुनीच अंगवोळी पडलेली सवय आहे, सध्या सरकारने आधी ५% टक्के नंतर १०% टक्के जाहीर केल्याप्रमाणे हे १०%टक्के अधिकारी-कर्मचाऱ्यांनी हजर राहावे असे मा मुख्यमंत्र्यांचा आदेश आहे ,परंतु या मुख्य पदावर काम करणारे अधिकारी व कर्मचारी ३०ते ४० टक्के हे औरंगाबाद येथून अपडाऊन करीत होते, त्यानंतर राज्य सरकारने जमावबंदी लागु केली, लगेच संचारबंदी लागु केली राज्य व केंद्र सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली, यामुळे काही अधिकारी कर्मचारी औरंगाबादला लॉकडाऊन मध्ये गुंतून पडले होते, ते १०% टक्के कर्मचारी-अधिकारी कामावर येतात किंवा नाही याची चौकशी व्हावी,कारण लॉकडाऊन काळामध्ये हे अधिकारी-कर्मचारी अपडाऊन तर करीत नाहीत ना ? हे सगळे आपापल्या हेडकॉटरला थांबलेले आहेत का नाही याची चौकशी होणे गरजेची आहे, कारण हे लोक अपडाऊन करीत असतील तर कोरोना इन्फेक्शन होण्याची भीती आहे, तसेच सरकारने जाहीर केल्याप्रमाणे १०% अधिकारी-कर्मचारी आपापल्या कार्यालयात कार्यालयीन कामकाजासाठी हजर आहेत किंवा नाही हे ८ हि तालुक्यातील तहसीलदार यांच्या मार्फत कसून चौकशी व्हायला हवी, कारण हे जर हेडकॉटर ला थांबलेले असतील तर इन्फेक्शन होण्याची भीती नाही परंतु हे औरंगाबाद किंवा इतर बाहेर जिल्ह्यातुन जाणे-येणे (अपडाऊन) करीत असतील तर, हा इन्फेक्शन होण्याचा मोठा धोका आहे, कधी यांची गाडी हुकल्याली असते तर कधी गाडी हुकण्याच्या नावाखाली हे कार्यालयात येत नसतात, याचे पंचनामे, तसेच अधिकारी-कर्मचारी निवासी (हेडकॉटरला) राहतात इतर ठिकाणी राहातात,याची चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जालना जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक