भोकरदन तालुका

वालसावंगीत लांडग्यांच्या हल्ल्यात तीन मेंढ्या गतप्राण:ग्रामस्थांत भीतीचे वातावरण

ज्ञानेश्वर गवळी:वालसावंगी न्यूज( ता भोकरदन)

भोकरदन तालुक्यातील वालसावंगी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ असलेल्या अशोक भुते यांच्या शेतात असलेल्या मेंढ्यावर शनिवारी रात्री लांडग्याने हल्ला करू तीन मेंढ्या गतप्राण झाल्या आहेत ही घटना रविवारी उगडीस आली असून घटनास्थळी सदर्भित विभागाने पंचनामा केला आहे.

वालसावंगी येथिल ह्याच गोठ्यावर शनिवारी लांडग्याने मेंढ्यावर हल्ला केला.(छायाचित्रे :- ज्ञानेश्वर गवळी)

सदर्भित हल्ला हा लांडग्याने केला असल्याचा प्रथिमक अंदाज असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे तर ह्या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण आहे. याबाबत सरपंच प्रतिनिधी बाळू आहेर यांनी वनविभागासह पशुवैद्यकीय अधिकारी यांना याबाबत माहिती दिली व सदर्भित शेतकऱ्यांला मदत मिळावी यासाठी वनविभागाला ग्रामपंचायत स्तरावरून कळविले आहे दरम्यान वनविभागाने पुढील प्रक्रिया सुरू केली असल्याचे दोडके यांनी कळविले आहे.

शनिवारी रात्री वालसावंगी फाट्यावर गावातील फाट्यावर लावण्यात आलेल्या कोरोनाच्या चेक पोस्टवर रात्री एक मेंढी त्यांना आढळून आली त्यामुळे एक मेंढीचा जीव वाचला असल्याचे

राजू आगे व सुभाष फुसे यांनी सांगितले याबाबत अशोक भुते यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी ही मागणी होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक