देशविदेश

शेतात जाणाऱ्या विवाहितेचा विनयभंग:पोलिसात गुन्हा दाखल


जामखेड न्यूज:- येथील एक 28 वर्षीय महिला तिच्या शेतात जात असताना तिचा वाईट उद्देशाने हात धरून तिचा विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी दुपारी अंबड तालुक्यातील जामखेड येथे घडले असून अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, अंबड तालुक्यातील जामखेड येथील राहणारी 28 वर्षे विवाहिता ही तिच्या शेतात जात असताना आरोपी सद्दाम कुरेशी हा मोटर सायकलवर तिच्या पाठीमागे येऊन तिस विचारले की तू एकटीच शेतात जातेस का असे म्हणून तिचा वाईट उद्देशाने हात धरून तुला शेतात सोडतो असे म्हणून तिस मोटरसायकलवर बसवण्याचा प्रयत्न केला. व तिच्या मनात लाज वाटेल असे कृत्य केले.
याप्रकरणी पोलिसात विवाहितेच्या फिर्यादीवरून आरोपी सद्दाम कुरेशी राहणार जामखेड याच्याविरुद्ध कलम 354 भा द वि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे हे करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक