एक हात मदतीचा : गजानन भैय्या लोणीकर मित्रमंडळाचा उपक्रम
लोणी प्रतिनिधी : अशोक चव्हाण
परतूर तालुक्यातील लोणी येथील यदाजी शिंदे यांना कसल्याही प्रकारचा आधार नसल्याने त्यांना गजानन भैया लोणीकर यांच्या मित्र मंडळा कडून छोटीसी मदत म्हणून किराणा साहित्य व राशन खरेदी करून दिले यात 50 किलो गहू, 50 किलो तांदूळ व अकराशे रुपये रोख रक्कम देऊन त्यांना सहकार्य केले व इतरांनाही मदत करण्यासाठी आवाहन केले.
यदाजी शिंदे हे लोणी येथील मंदिरात पुजारी म्हणून काम पाहतात त्यांना ठोस उत्पन्न नसल्याकारणाने हतबल होण्याशिवाय पर्याय नव्हता त्यांचा लहान मुलाला सुगर आसल्या कारणाने दवाखाना व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी घरातील अडीअडचणी सोडव्यासाठी त्यांना मदत करावी असे आवाहन मित्र मंडळाने केले आहे.
शिंदे यांना कुठलीही कमई नसताना संकटांना तोंड देत ते जगत आहे अशा वेळी फुल ना फुलाची पाखळी म्हणून गजानन भैय्या लोणीकर मित्र मंडळ यांच्या पुढाकाराने मदत केली.
यावेळी गजाजन भैय्या लोणीकर, पुरुषोत्तम यादव,कृष्णा वाघमारे, नंदकुमार गाजे, रमेश अंकूशकर, संतोष नवघरे, असद शेख, साळीकराम तौर, राजेश जंगाळे,ईश्वर अंकुश अंकुशकर, संतोष यादव व आदी मित्रमंडळाचे सदस्य उपस्थित होते.