अतिवृष्टीने घनसावंगी तालुक्यात नुकसान झालेल्या पिकांचे नुकसान भरपाई देण्याची शिवसेनेची मागणी
कुंभारपिंपळगाव:घनसावंगीचे तहसीलदार श्री.नरेंद्र देशमुख यांना आज शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी तालुकाप्रमुख उद्धव मरकड व इतर.
कुलदीप पवार/कुंभार पिंपळगाव
घनसावंगी तालुक्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे नुकसान भरपाई देण्याची मागणी शिवसेनेने आज दि.(७) मंगळवार रोजी तहसीलदारामार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
दिलेल्या निवेदनात केले आहे की,घनसावंगी तालुक्यात मागील आठ दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे.त्यामुळे सोयाबीन कापूस तूर उस आदी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. पीक पूर्णपणे वाया गेली आहेत.यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे.यामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक अडचणीत सापडला आहे.
घनसावंगी तालुक्यातील मुरमा, खालापूरी, खडका,पिंपरखेड, कंडारी अंबड,पाडूळी,अंतरवाली टेंभी,मंगरूळ, शेवता, बाणेगाव,भोगगाव,कोठी,मुद्रेगाव,जोगलादेवी,रामसगाव,लिंबोणी,बोडखा, दहीगव्हाण सह तालुक्यातील अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे.शेतीपिकासह पशूधनाची मोठी हानी झालेली आहे.विजेच्या कडकडाटामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलेला असून जनजीवन विस्कळित झाले आहेत.त्यामुळे हजारो हेक्टर पिके पाण्याखाली गेली आहेत.काढणीस आलेली मूग,बाजरी, पूर्णपणे काळे पडून खराब झालेली आहे.तर कापूस सोयाबीन तूर, भाजीपाला फळबागा पिवळ्या पडल्या आहेत.उस आडवी पडलेली आहे.त्यामुळे शासनाने पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी नसता नारोळा नदीच्या पात्रात जलासमाधी घेण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.