आष्टीत आगळा वेगळा गणेशोत्सव साजरा तरुणांच्या पुढाकाराने रक्तदान शिबिराचे आयोजन
31 रक्तदात्यांनी केले रक्तदान
आष्टी प्रतिनिधी :- आष्टी ता परतूर येथे तरुणांनी आगळा वेगळा गणेशोत्सव साजरा करीत सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यास प्रतिसाद देत 31 रक्तदात्यांनी सहभाग देत रक्तदान केले
या विषयी अधिक माहिती अशी की काल दिनांक 15 रोजी आष्टी येथील महाविर चौक येथे बसवण्यात आलेल्या स्वराज्य गणेश मंडळाच्या वतीने या वर्षी आगळा वेगळा गणेशोत्सव साजरा करीत सामाजिक बांधिलकी जपत राज्यात असलेल्या रक्ततुटवड्या च्या पार्श्वभूमीवर या गणेश मंडळाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते यात 31 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान जीवन दान म्हणत प्रतिसाद दिला त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे या वेळी श्री स्वामी समर्थ ब्लड बँक जालना च्या वतीने रक्त संकलन केले तर अजय सातपुते, व्यंकटेश शहाणे, विजय सातपुते सह त्यांच्या सहकाऱ्यांनी या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.या वेळी रक्तदात्यांना सन्मानपत्र देण्यात आले.