जालना मंठा महामार्गावर खड्यांनी मांडले बस्तान
उप संपादक- बबनराव वाघ
जालना मंठा महामार्गाला रामनगर येथे मोठ मोठे खड्डे पडले असुन मोटार सायकल व कार चालकांना याच मार्गाने जीव धोक्यात घालून करावा लागत आहे प्रवास.पावसाळा आलाकी रस्त्यांवरील खड्डे हा चर्चेचा विषय असतात, परंतु त्याची दुरूस्ती करणे हे त्या गुत्तेदाराचे कर्तव्य आहे.गुत्तेदार मात्र फक्त टोल वसुली करण्यातच मग्न असुण वाहणधारकाच्या जिवाची त्याचा कसलीही पर्वा नाही.
रामनगर ही जालना तालुक्यातील मोठी बाजारपेठ असुन परीसरातील जवळपास चाळीस खेड्यांना जोडलेली आहे. या खेड्यातील लोकांना दळनवळनाचा हा मार्ग असल्यामुळे सर्वांनाच या खड्यांचा त्रास होत असतो.रात्रीच्या वेळी सुसाट वेगाने वाहने चालतात, नविन वाहनचालकांना माहीत नसते की रस्त्यावर किती मोठ मोठे खड्डे आहेत. कित्तेक वाहनांचे यात मोठे नुकसान देखील झाले आहे. तरी प्रशासनाने याकडे लक्ष देवून संबधीत गुत्तेदाराला आपल्या कर्तव्याची जाणीव करूण द्यावी जेणेकरून महामार्गाचा कायापालट होईल व वाहनधारकांचे जीव वाचतील.