जमिनीच्या व्हॅल्यूवेशन प्रमाणे नुकसान भरपाई द्या
कुंभार पिंपळगाव:विविध मागण्यांसाठी तहसीलदार यांना निवेदन देताना राजाटाकळी येथील शेतकरी
शेतकरी संघर्ष समितीचे तहसीलदारांना निवेदन
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
घनसावंगी तालुक्यातील राजाटाकळी येथील बागायती क्षेत्राला नुकसान भरपाई देण्यात यावी,अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आज दि.(१८) सोमवार रोजी घनसावंगी चे तहसीलदार नरेंद्र देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राजाटाकळी येथील शिवारातील संपूर्ण क्षेत्र बागायतीचे आहे.हे गाव इरीगन क्षेत्रात येते.संपूर्ण बागायती क्षेत्र जमीन असून जमीनीचे खरेदी -विक्रीचे व्यवहार हे त्याच प्रमाणे व्हल्यूवेशन नुसार आहेत.अतिवृष्टीने येथील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे बागायती क्षेत्रा प्रमाणे हेक्टरी १५ हजार रूपये आर्थिक मदत करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.या निवेदनावर शेषेराव आर्दड,गंगाधर आर्दड,डिगांबर आर्दड, गोविंद आर्दड,कालीदास राउत,लक्ष्मण खरात,उमेश मुंदडा,विनोद बहीर,रवी गोरे यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.