जालना जिल्ह्यात व तालुक्यात सम विषम पार्कींग व्यवस्था
न्यूज जालना दि. 23
जालना जिल्ह्यातील वाढती लोकसंख्या व पर्यायाने वाढत्या वाहनांमुळे पार्कींगसाठी समस्या उद्भवत असल्यामुळे या मार्गावर येणा-या दुचाकी व चारचाकी वाहनांचे अस्थावस्थ पार्कींगमुळे वाहतुक कोंडी होत असते तसेच नागरीकांची सुरक्षितता धोक्यात येते. यावर उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने पोलीस अधिक्षक जालना यांच्या सुचनेवरुन जिल्ह्यातील संबंधीत पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी जिल्ह्यातील P 1 – P2 सम व विषम पार्कींग व्यवस्था करण्याकरीता ठिकाण निश्चित केले आहेत. संबंधित शहरातील खालील नमुद ठिकाणी सम विषम तारखेस P 1 – P2 पार्कींग व्यवस्था लागु करण्यात आली आहे.
पोलीस ठाणे भोकरदन येथे छत्रपती शिवाजली महाराज चौक ते ग्रामीण रुग्णालय भोकरदन, पोलीस ठाणे जाफ्राबाद येथ छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बसस्टँड जाफ्राबाद, पोलीस ठाणे हसनाबाद येथे हसनाबाद शहरातील मुख्य रस्ता, पोलीस ठाणे टेंभुर्णी येथे टेंभुर्णी शहरातील मुख्य रस्ता, पोलीस ठाणे पारध येथे धावडा बसस्टँड ते ग्रामपंचायत रोड, पोलीस ठाणे आष्टी येथे आष्टी पोलीस स्टेशनचे मेन गेट ते माजलगांव रोड मुख्य रस्ता, पोलीस ठाणे परतुर येथे रेल्वे गेट परतुर ते मलंगशहा चौक, पोलीस ठाणे अंबड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते महाराष्ट्र वेश रोड, जालना -बीड हायवे ते नगर परिषद अंबड रोड, जालना-बीड हायवे ते स्टेट बँक रोड, महाराष्ट्र वेश ते अंबड पाचोड हायवे दरत्यान रस्ता, वडगांवकर हॉस्पीटल ते अंबड पाचोड हायवे दरम्यानचा रस्ता, पोलीस ठाणे गोंदी येथे तिर्थपुरी मेन चौक बाजार रस्ता, शहागड येथील बाजार गल्ली, पोलीस ठाणे घनसावंगी येथे बँक ऑफ महाराष्ट्र ते घनसावंगी जाणारा रोड, पोलीस ठाणे मंठा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते विडोळी फाटा.
हा नियम शासकीय वाहने, ॲम्बुलन्स, अग्निशामक दलाचे वाहन वगळुन राहील अशी सुचना जिल्हाधिकारी जालना यांनी दिली आहे.