लसीकरणाची वर्षपूर्ती, ९० टक्के लोकांचा पहिला डोस पूर्ण – आरोग्य मंत्री राजेश टोपे
जालना : लसीकरणाला एक वर्ष पूर्ण झाले असून, राज्यात लसीकरणासाठी पात्र 90 टक्के नागरिकांना पहिला तर, 62 टक्के नागरिकांना दुसरा डोस देण्यात आल्याची प्रतिक्रिया राजेश टोपे यांनी दिली.
राज्यातल्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत. पंधरा दिवसानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन ज्या ठिकाणी रुग्ण नाहीत तिथे पन्नास टक्के क्षमतेने शाळा पुन्हा सुरू कराव्यात, अशी मागणी होत आहे. त्यामुळे पंधरा दिवसांचा आढावा घेवून यावर पुनर्विचार करण्यात येईल आणि त्यानंतर मुख्यमंत्री यावर निर्णय घेतील, असे टोपे म्हणाले.
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या जरी मोठी असली तरी, मृत्युदर मात्र खूप कमी आहे. ही सर्व उपलब्धी लसीकरणाची आहे. सर्वांनी लसीकरण करणे गरजेचे असल्याचे राजेश टोपे म्हणाले. आज लसीकरणाला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे, टार्गेट पूर्ण करण्याची नम्रतापूर्वक विनंतीही टोपे यांनी महाराष्ट्र्राच्या जनतेला केली आहे. आज राज्यात एकूण बाधित संख्या ही जवळपास 2 लाख 65 हजार इतकी आहे. त्यापैकी 86 ते 87 टक्के लोक हे होम गृह विलगीकरणात आहेत. त्यांना तापासारखी माईल्ड स्वरुपाची लक्षणे आहेत. त्या अनुषंगाने त्यांना संध्या हॉस्पिटलाईज करण्याची आवश्यकता नाही. काळानुसार लसीकरण करून घेण्याची गरज असल्याचे टोपे सांगितले