CBSE बोर्ड : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी
सीबीएसई बोर्डाने दहावीच्या टर्म 1 चे निकाल जाहीर केले आहेत. सीबीएसई बोर्डाच्या शाळांकडे निकाल सोपवण्यात आले आहेत. निकाल जाहीर झाले असले तरी विद्यार्थ्यांच्या हाती अद्याप मार्कशीट पडलेली नाही. फक्त किती गुण मिळाले तो आकडा जाहीर झालेला आहे. सीबीएसईने या वेळी दहावीची परीक्षा दोन सत्रांत घ्यायचा निर्णय घेतला होता. त्यातील पहिल्या सत्राचा हा निकाल आहे. काही विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी म्हणजे 100 टक्के गुण मिळाले आहेत.
गुणपत्रिका कधी मिळणार?: सीबीएसई बोर्डाने निकाल शाळांकडे सोपवले असल्याची माहिती दिली आहे. आता शाळा आपापल्या पातळीवर गुणपडताळणी करून विद्यार्थ्यांना गुणपत्रिका वाटप करतील. दरम्यान, या वर्षी दोन सत्रांत परीक्षा घ्यायचा निर्णय झाला होता. दुसऱ्या सत्राची परीक्षा एप्रिल-मे मध्ये होणार आहे. म्हणजे यंदापासून सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना दोन वेळा बोर्डाची परीक्षा द्यावी लागेल.