जयसिंह अर्बन वाटुर शाखेचे उद्घाटन: ठेवीदार व खातेदारांचा विश्वास संपादन करणार – प्रल्हादराव बोराडे
वाटूर /प्रतिनिधी :(मानसिग बोराडे) वाटुर येथे जयसिंह अर्बन शाखेचे उद्घाटन गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शनिवार (ता.2) रोजी श्री चैतन्य महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. जयसिंह अर्बन मार्फत ठेवीदार व खातेदारांना सुविधा देणार असून ग्राहकांचा विश्वास संपादन करणार असल्याचे बँकेचे अध्यक्ष प्रल्हादराव बोराडे यांनी सांगितले.
या उद्घाटन प्रसंगी आमदार राजेश राठोड, माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया, शिवसेना जिल्हाप्रमुख ए जे पाटील बोराडे, भाजपाचे प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर, अंकुशराव अवचार, मंठा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप गोरे, परतूर बाजार समितीचे सभापती कपिल आकात, उपसभापती राजेश मोरे, कैलास बोराडे, सचिन बोराडे, वैजनाथ बोराडे, भाजपा तालुका अध्यक्ष सतीश निर्वळ, तालुकाप्रमुख अजय अवचार, गटनेते तथा नगरसेवक अच्युत बोराडे, माजी सभापती संतोष वरकड, लक्ष्मणराव शिंदे, शेख मजहर भाई, बालासाहेब बोराडे, दिगंबर बोराडे, विकास सूर्यवंशी, दीपक बोराडे, मुस्तफा पठाण, सरपंच केसरखाने, रामराव लावणीकर, बद्रीनारायण खवने, संजय राठोड, गणपतराव वारे, राधाकिसन माने, सुभाषराव घारे, सरपंच परमेश्वर उबाळे, हरीराम माने, रामेश्वर तनपुरे, किसनराव मोरे, विकास सूर्यवंशी, संजय सरोदे, तुळशीराम कोहीरे, बाळासाहेब घारे, विठ्ठलराव काळे, नागेश घारे, हरिभाऊ चव्हाण, निवास देशमुख,उबेद बागवान, संतोष दायमा, बालाजी कुलकर्णी, सहदेव मोरे, डॉ.ए.डी.बोराडे, दत्ता घुगे, इंजी. निंबाळकर, कल्याण खरात, डॉ. संतोष पवार, शरद मोरे, पप्पू दायमा, राजेश घारे, निलेश जोजारे यांची उपस्थिती होती. जयसिंह अर्बनच्या उद्घाटनासाठी आलेल्या मान्यवरांचे स्वागत शिवसेना शहरप्रमुख तथा बाजार समितीचे संचालक प्रल्हादराव बोराडे, पंजाबसिंह बोराडे,उदयसिंह बोराडे, मानसिंह बोराडे यांनी केले.