परतूर तालुका

एकोप्याने राहून शांतता जतन करा-    पोलिस निरीक्षक शामसुंदर कौठाळे

दिपक हिवाळे / परतूर न्युज नेटवर्क

images (60)
images (60)


 सध्या समाजात तेढ निर्माण होणारे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र स्थानिक नागरिकांत तसे दिसून येत नाही. सर्व धर्मियांनी एकोप्याने राहून शांतता जतन करा असे आवाहन पोलिस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांनी केले आहे. ते पोलिस ठाण्यात हिंदू मुस्लिम बांधवांच्या बैठकीत संवाद साधतांना बोलत होते. 


यावेळी अखिल काजी, शिवसेनेचे महेश नळगे, दीपक कदम, गजानन चवडे, निसार चाऊस यांच्यासह आदि उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना पोलिस निरीक्षक शामसुंदर कौठाळे म्हणाले की नुकताच रमजान सण झाला आहे. येणारे सण उत्सव काळात सर्व धर्मियांनी गुण्यागोविंदाने राहून दोन समाजात गैरसमज न होऊ देता. शहरात एकमेकांशी सलोख्याने वागावे. सध्या राजकीय वातावरण स्वरूप बदलत असल्याने सोशल मीडियाच्या अफवाकडे लक्ष न देता वस्तुस्थिति पाहून प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे. समाजात वावरत असतांना एकमेकांशी दररोज व्यवहारात सर्वधर्माशी संबध येत असल्याने आपल्यात वाद न करता शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. गेल्या दोन वर्ष हे कोरोनाच्या काळात गेले. त्यात सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक गरजा भागण्यासाठी अडचणीचा सामना करीत त्यातून बाहेर पडलो आणि आता कामधंदे सुरुळीत सुरू झाले असतांना नागरिकांना शांतता हवी असल्याने एकोप्याने राहून शांतता जतन करा असे आवाहन शेवटी कौठाळे यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!