…अखेर कुंभार पिंपळगाव – पुणे बससेवा सुरू
अंबड आगाराची कुंभार पिंपळगाव – पुणे एसटी बस सेवा सुरू
जालना / प्रतिनिधी
अंबड आगाराचे आगारप्रमुख सुरेश टकले यांनी मंगळवार पासून कुंभार पिंपळगाव व परिसरातील प्रवाशांच्या सेवेसाठी लांब पल्ल्याची कुंभार पिंपळगाव – पुणे हि एसटी बस सेवा सुरु केली.हि बस सकाळी ०६:३०ला अंबड मधुन सुटेल व कुंभार पिंपळगाव ला ०७:३० ला पोहोचेल.सदरील एसटी बस हि कुंभार पिंपळगाव – पुणे सकाळी ०७:३० ला कुंभार पिंपळगाव बसस्थानकातून मार्गे घनसावंगी अंबड पाचोड पैठण शेवगांव अहमदनगर शिरूर पुणे ला दुपारी ०४:०० ला पोहोचेल.त्यानंतर हि एसटी बस पुणे वरुन याच मार्गे परत मध्यरात्री १२:०० पर्यंत अंबड ला पोहोचेल.दरम्यान अंबड आगार प्रमुखांनी हि एसटी बस सेवा सुरु केल्याबद्दल कुंभार पिंपळगाव व परिसरातील प्रवाशांनी समाधान व्यक्त करून या एसटी बस चे चालक जी.के.लोखंडे व वाहक के.आर.देशमुख यांचा सत्कार केला.
यावेळी भागवत राऊत बाळु व्यवहारे तुकाराम पवार गणेश टेकाळे बंडु आडाणी कठ्ठुमियाॅ पठाण अनिल कंटुले मुकुंद पाखरे बेलाराम हेलुडे नामदेव शिंदे सुभाष राऊत निलेश शिंदे उत्तम टेकुडे बापु जाधव यांच्या सह कुंभार पिंपळगाव व परिसरातील प्रवाशी उपस्थित होते.