जालना जिल्हा

एकजुटीने पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार-जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर



जालना, दि. १४(प्रतिनिधी)- जालना जिल्हा शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणी
बैठक १३ जुलै रोजी शहरातील शिवसेना भवनात झाली. यावेळी माजीमंत्री तथा
उपनेते अर्जुनराव खोतकर, उपनेते लक्ष्मणराव वडले,संपर्कप्रमुख
शिवाजीराव चोथे, जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, ए.जे. बोराडे, माजीआमदार संतोष सांबरे, युवासेना राज्यविस्तारक अभिमन्यु खोतकर यांच्याप्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीचे आयोजन जिल्हाप्रमुख भास्कररावअंबेकर, ए.जे.बोराडे यांनी केले होते.या बैठकीत माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांची शिवसेना उपनेतेपदी निवडझाल्याबद्दल जिल्हा शिवसेनेच्या वतीने त्यांचा शिवसेना उपनेते लक्ष्मणराववडले, उपनेते लक्ष्मण वडले, सहसंपर्कप्रमुख शिवाजीराव चोथे,जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, ए.जे.बोराडे, माजी आमदार संतोष सांबरेयांनी सत्कार केला. याप्रसंगी सत्काराला उत्तर देतांना उपनेते तथामाजीमंत्री अर्जुनराव खोतकर म्हणाले की, पक्षाने उपनेते पदाची माझ्यावर
मोठी जबाबदारी सोपविलेली असून त्यास मी पुर्ण न्याय देण्याचा प्रयत्न करीन. शिवसेनेच्या जिल्ह्यात सुरुवातीच्या काळापासून मी साक्षीदार आहे.अत्यंत खडतर परिस्थितीत पक्ष उभा करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. मीराज्यात मंत्रीपदापर्यंत पोहोचलो परंतु पक्ष संघटनेत कधी शाखाप्रमुखही नव्हतो. पक्षाने आता मला थेट उपनेते पदाची जबाबदारी दिली आहे. येत्या
काळात सर्वच निवडणुका अत्यंत ताकदीने लढणार असल्याचे सांगून ते म्हणालेकी, देशात सध्या वाढत असलेल्या एकाधिकार शाहीमुळे भविष्यात आपल्यादेशातही श्रीलंकेसारखी परिस्थिती उद्भवल्यास नवल वाटू नये, असे सांगूनसत्काराबद्दल जिल्हा शिवसेनेचे त्यांनी आभार व्यक्त केले.

images (60)
images (60)


यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना शिवसेना उपनेते लक्ष्मणराव वडले म्हणाले की, शिवसेना हा निष्ठावंत कार्यकत्र्यांला न्याय देणारा पक्ष आहे. त्यामुळे सध्याच्या राजकीय परिस्थितीकडे पाहून कोणीही विचलिंत होवू नका, असे आवाहन केले. सध्या राज्यासह देशात भाजपाच्या वतीने शासकीय
यंत्रणांचा गैरवापर करुन भाजपा व्यतिरिक्त असणारे सरकार गिळंकृत केली जात आहेत. देशाची वाटचाल हिटलर शाहीकडे होतांना जाणवते. असे सांगून त्यांनी
माजीमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या उपनेतेपदी झालेल्या निवडीचा फायदा संपुर्ण मराठवाड्यालाच होणार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी बोलतांना सहसंपर्वâप्रमुख शिवाजीराव चोथे म्हणाले की, सध्याच्या राजकीय घडामोडीमुळे शिवसेना पक्षाचा अत्यंत संघर्षाचा काळ सुरु असून प्रत्येक कार्यकत्र्यांनी पक्ष सावरण्याचा पुरेपुर प्रयत्न करावा.
प्रत्येकांने पक्ष मजबुतीसाठी कसोसीने झटून कामाला लागावे व मला विश्वास वाटतो की आपण सर्वच आघाड्यांवर मनापासून काम केल्यास शिवसेनेला गतवैभव प्राप्त निश्चितच प्राप्त करुन देवू, असे चोथे म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना शिवसेना

जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर म्हणाले की,
जालना जिल्ह्यासाठी पक्षाच्या वतीने माजीमंत्री अर्जुनराव खोतकर यांची
शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती केली. निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे.
माजीमंत्री अर्जुनराव खोतकर हे नेतृत्व अत्यंत संघर्षातून तयार झालेले
असून पक्षाने दिलेल्या जबाबदारीमुळे जिल्ह्यात पक्षाची ताकद निश्चितच
वाढण्यास मदत होणार आहे. विद्यार्थी चळवळीपासून सुरु झालेला त्यांचा
राजकीय प्रवास कार्यकत्र्यांसाठी प्रेरणादायकच आहे, राज्यात घडत असलेल्या
घडामोडींचा परिणाम जिल्ह्यात होणार नाही. आपण सर्व एकजुट होवून या
संकटाचा सामना करुन व पक्ष संघटन भकम ठेवणार असल्याचेही अंबेकर म्हणाले.
आज झालेल्या बैठकीला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, माजी
जिल्हाप्रमुख बाबासाहेब इंगळे, उपजिल्हाप्रमुख भगवान कदम, माधवराव कदम,
रावसाहेब राऊत, रमेश गव्हाड, हनुमान धांडे, बाबासाहेब तेलगड, किसान
सेनेचे भानुदास घुगे, दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्करराव मगरे,
महिला आघाडीच्या सविता किवंडे, अल्पसंख्याक आघाडीचे जावेद शेख, शहरप्रमुख
विष्णु पाचपुâले, माजी शहरप्रमुख बाला परदेशी, संघटक दिपक रननवरे,
बाबुराव पवार, यादवराव राऊत, बबनराव खरात, वैâलास पुंगळे, गणेश डोळस,
संतोष वरकड, वैâलास चव्हाण, भरत मदन, पांडूरंग डोंगरे, सुधीर पाखरे,
तालुकाप्रमुख संतोष मोहिते, जयप्रकाश चव्हाण, माधवराव हिवाळे, अशोक बरडे,
अशोक आघाव, उध्दव मरकड, अजय अवचार, भरत सांबरे, घनश्याम खाकीवाले,
दुर्गेश काठोठीवाले, प्रभाकर घडलिंग, सखाराम गिराम, महेश दुसाने, शिवा
शेजुळ, भगवान अंभोरे, दिनेश भगत, विजय जाधव, अनिल अंभोरे, दादाराव
पाचपुâले, कमलेश खरे, अप्पासाहेब उगले, कडूबा इंदलकर, जनार्दन चौधरी, भरत
कुसूदल, लखन कनिसे, मनोज लाखोले, दिपक राठोड, जगदीश रत्नपारखे, जगनाथ
चव्हाण, चेतन भुरेवाल, नरेश खुदभैये, प्रभाकर पवार, किशोर शिंदे, ताराचंद
जाधव, गोपाळ काबलिये, गणेश घुगे, अजय कदम, अमोल ठावूâर, भोला कांबळे,
रविकांत जगधने, जफरखान पठाण, विक्रम कुसूदल, महिला आघाडीच्या विजयाताई
चौधरी, दुर्गा देशमुख, संगिता नागरगोजे, मंजुषा घायाळ, मंगल मिटकर, आशा
पवार, शोभा खोत, सिमा पवार, बालासाहेब जाधव, शिवाजी जाधव, बाबुराव
कायंदे, संतोष सलामपुरे, महेश नळगे, गणेश चौरे, अंबासाहेब कदम, मधुकर
पाईकराव, दत्ता सुरुंग,रामेश्वर कुरिल यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेना
पदाधिकायांची उपस्थिती होती.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!