कुंभार पिंपळगाव येथील शाळेत दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा

कुंभार पिंपळगाव प्रतिनिधी /कुलदीप पवार
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील शंकरराव पाटील तौर प्राथमिक शाळा व गोदावरी इंग्लिश स्कूल शाळेत शुक्रवार (ता.१९) रोजी गोकुळाष्टमी निमित्त दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहन अवचार व प्रमुख पाहुणे म्हणून विनायक कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.दरम्यान,दोन्ही शाळेतील काही विद्यार्थी राधा कृष्णाच्या पारंपरिक वेशभूषेत येऊन दहीहंडीच्या कार्यक्रमात सहभाग घेतला.तसेच विद्यार्थ्यांनी विविध दहीहंडी पथक तयार करून प्रत्येक पथकाने दहीहंडी फोडण्यासाठी तीन ते चार थर लावून फोडण्याचा प्रयत्न केला.शेवटी एका शंकरराव पाटील तौर प्राथमिक शाळेच्या पथकाने दहीहंडी फोडली व दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला.यावेळी या कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक विष्णु शिंदे,निळकंठ खिस्ते,दिपक सांगळे,भगवान साबळे,विजयकुमार काळे व सहदेव वाघमारे आणि सर्व मॅडम यांनी परिश्रम घेतले.