घनसावंगी तालुका
श्रीमती सरस्वतीबाई श्रीनिवासराव बोरीकर स्मृती आंतरशाखीय वक्तृत्व स्पर्धेत यश

जालना : घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे श्रीमती सरस्वतीबाई श्रीनिवासराव बोरीकर स्मृती आंतरशाखीप वक्तृत्व स्पर्धा औरंगाबाद येथील श्री शारदा मंदिर प्रशालेत घेण्यात आल्या त्यात श्री सरस्वती भुवन प्रशाला कुंभार पिंपळगावची विद्यार्थ्यांनी कु.गणकवार एकता दिलीप (वर्ग 8 वी) हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे.
प्रशालेचे मुख्याध्यापक मा.मधुकर बिरहारे सर,उपमुख्याध्यापक सुभाष देठे सर सर्व विद्यार्थ्यांन सह शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांनी एकताने मिळवलेल्या यशाबद्दल पुष्पगुच्छ देऊन तिचे अभिनंद व कौतूक केले. या वेळी एकता गणकवार चे वडील दिलीप गणकवार उपस्थित होते त्यांचे सुध्दा प्रशालेतर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी हया विद्यार्थीनिला मार्गदर्शन करणारे शिक्षक बजरंग व्यवहारे व शिवप्रसाद काळे यांचा ही पुष्पगुच्छ देऊनही सत्कार करण्यात आला.