बंजारा भजनास परवानगी नाकारुन तो कार्यक्रम रद्द करावा गोरसेनेची मागणी
न्यूज जालना प्रतिनिधी/कुलदीप पवार
घनसावंगी तालुक्यातील बोरगाव तांडा येथे आज (ता.१९) सोमवार रोजी रात्री ठिक आठ वाजता भारतीबाई पवार यांचा बंजारा भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.भारतीबाई पवार या बंजारा भाषेतून अश्शिल शब्द वापरतात.यामुळे बंजारा समाजातील जनतेच्या भावना दुखवतात.भारतीबाई पवार यांच्या कार्यक्रमास्थळी तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाहीत.त्यामुळे त्यांच्या या कार्यक्रमासाठी परवानगी नाकारुन कार्यक्रम हा रद्द करण्यात यावा,अशी मागणी गोरसेनेसह घनसावंगी। तालुक्यातील ४४ तांड्यातील नागरीकांच्या वतीने रविवार (ता.१८) रोजी पोलीस निरिक्षक प्रशांत महाजन यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनावर परमेश्वर राठोड,तुकाराम महाराज राठोड,मुरलीधर राठोड,विजय पवार,बाळू राठोड,गणेश राठोड,छबूराव पवार,सतिष राठोड, संजय राठोड,शंकर चव्हाण,अंकुश चव्हाण,गणेश पवार,अभिजीत पवार यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.