घनसावंगी तालुकाजालना जिल्हा
बाणेगाव येथील जळालेल्या ऊसाची समृद्धीचे चेअरमन सतिष घाटगे यांनी केली पाहणी

कुलदीप पवार/प्रतिनिधी
घनसावंगी तालुक्यातील बाणेगाव येथे शार्टसर्किटमुळे पंचवीस एकर लागवड केलेल्या उसाला आग लागल्याची घटना आज दि.23 वार रविवार रोजी सकाळच्या सुमारास घडली होती. या घटनेची माहिती समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीशराव घाटगे पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन संबंधित शेतकऱ्यांना धीर दिला. व कारखाना सुरु होताच जळालेल्या उसाची पहिली मोळी टाकून गाळप केले जाईल. अपघाती घटनेमुळे जळालेला ऊस जळीत न धरता पुर्ण एफ आर पी प्रमाणेच हमीभाव देण्यात येईल अशी ग्वाही दिली. यावेळी बाधित संबंधित उस उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी संचालक दिलीप फलके,मुख्य शेतकी अधिकारी अमोल तौर, पुरूषोत्तम उढाण, कृष्णा लिंगसे यांच्यासह आदी शेतकऱ्यांची उपस्थिती होती.