जालना जिल्हा
जांब समर्थ गावातील राम मंदिरातील मुर्ती चोरी प्रकरणात दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले

जालना : जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थ गावातील राम मंदिरातील मुर्ती चोरी प्रकरणात दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.प्रदिर्घ काळानंतर मूर्ती चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या (Icb) पथकास मोठं यश आले आहे.
घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थ गावातील रामदास स्वामी यांच्या पूर्वजांनी पंच धातूच्या सुमारे ७५० वर्षपूर्वी स्थापन केलेल्या प्रभू श्रीरामचंद्राच्या आणि हनुमान, सीता, भरत शत्रुघ्न, आदींच्या १३ मूर्ती गेल्या दोन महिन्यांपूर्वी पासून चोरी गेल्या होत्या.या प्राचीन मूर्तीचा कुठल्याच प्रकारे ठाव ठिकाणा लागत नसल्याने भविकांकडून या मूर्ती चोरी प्रकरणाचा छडा लागावा म्हणून आंदोलन देखील करण्यात आले होते.