ला. ब. शा. प्रा. शाळा मोंढा परतूर व स्वामी विवेकानंद मा. विद्यालय येथे कायदेविषयक शिबीर संपन्न…

दीपक हिवाळे /परतूर न्युज नेटवर्क
परतूर :गुरुवार 22 डिसेंबर 2022 रोजी स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय परतुर येथे कायदेविषयक शिबीर आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिवाणी न्यायाधीश क स्तर एल. डी, कोरडे.अध्यक्ष तालुका विधी समिती परतूर,
प्रमुख पाहुणे म्हणून सहदीवाणी न्यायाधीश आर.बी.सुर्यवंशी,तालुका अध्यक्ष वकील संघ ए.जी. चव्हाण,
संस्थेचे अध्यक्ष महेश आकात. उपस्थित होते.
या वेळी कार्यक्रमा चे सूत्र संचालन श्री ए. ए. जवळेकर यांनी केले. तसेच प्रमुख मार्गदर्शन मा. श्री एल. डी. कोरडे साहेब , मा. श्री आर. बी. सूर्यवंशी साहेब ,
ऍड, पूजा देशपांडे, ऍड. एम पी वेडेकर ऍड आर एल.पाईकराव यांनी केले.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना पोकसो कायदा बाबत विस्ताराने समजावले.कायदा बाबत भीती बाळगण्यापेक्षा कायदा वापरण्याची वेळच येऊ देऊ नये याबाबत क्रिडा, शिक्षक, व शिक्षिका यांनी जागृत असले पाहिजे गुड टच बॅड टच बाबत मुलाना समजावले पाहिजे. यासर्व विषयावर सखोल असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना दिवाणी न्यायाधीश कस्तर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीते करिता शाळेचे मुख्याध्यापक अ.र. तनपुरे,बी.बी इंगळे, आर. व्ही.चांदजकर, वसतीगृहाचे अधीक्षक जि.एस. गुंड,व शाळेतील शिक्षक शिक्षिका यांनी प्रयत्न केले,
कार्यक्रमाचे आभार ऍड एस.आर काळे,यांनी मानले.