घनसावंगी तालुकाजालना जिल्हा
आजपासून भेंडाळा येथील गुप्तेश्वर मंदिरात महायज्ञाला सुरूवात, तीन दिवस विविध कार्यक्रम
कुलदीप पवार/न्यूज जालना
घनसावंगी तालुक्यातील भेंडाळा व विरेगव्हाण तांडा येथील गुप्तेश्वर मंदिरात आज (दि.१७) पासून महायज्ञाला सुरूवात झालेली आहे. यानिमित्ताने तीन दिवस विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये, शिवलीला अमृत पारायण,दिपोत्सव,शिवजागर, गणेश मुर्तीची प्राणप्रिष्ठापणा,रक्तदान शिबीर,व विविध क्षेत्रातील नामांकित मान्यवरांना पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. या महायज्ञास उपस्थित राहण्याचे आवाहन गुप्तेश्वर मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.