जालना जिल्हा

वीज वितरण कडून कुंभार पिंपळगाव परिसरात पावसाळापूर्व देखभाल सुरू


सात तास वीजपुरवठा खंडित करून २२ किमी लांबीच्या तारांमधील अडथळे दूर

कुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव परिसरातील वीजपुरवठा सात तास बंद ठेवून वीज वितरण कंपनीकडून पावसाळापूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली. घनसावंगी ते कुंभार पिंपळगाव या २२ किलोमीटर लांबीच्या वीजवाहिन्यांवरील झाडांच्या फांद्या कापून अडथळे दूर करण्यात आले. या मोहिमेत सबस्टेशनची देखभाल-दुरुस्ती, ३३ केव्ही लाईन दुरुस्ती तसेच रोहित्रांची तपासणी व दुरुस्ती अशी विविध कामे पार पाडण्यात आली. पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी ही कामे अत्यंत महत्त्वाची असल्याचे वीज वितरण कर्मचाऱ्यांनी सांगितले.


या कामांचे नेतृत्व सहायक अभियंता विशाल वीसपुते यांनी केले. यावेळी प्रधान तंत्रज्ञ शंकर सेजुळ, वरिष्ठ तंत्रज्ञ गजानन पांचाळ, नारायण सुरासे, हनुमंत केदार, तंत्रज्ञ गणेश गुंजवटे, विद्युत तंत्रज्ञ गोविद राजूरकर, अंगद नाईकनवरे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. ट्री कटिंग उपकरणांच्या सहाय्याने तारांमधील अडथळे दूर करण्यात आले. या पावसाळापूर्व देखभाल कामांमुळे आगामी पावसाळ्यात वीजपुरवठा अधिक सुरळीत व सातत्यपूर्ण राहण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!