ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ मदत जाहीर करा :ज्ञानेश्वर शेजुळ
मागील दहा पंधरा दिवसापासुन पडत असलेल्या संततधार पावसामुळे,सोयाबीन ,कापुस,मका पिकांचे मोठे नुकसान झाले आहे पिकांना कोंब फुटल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे कपाशीच्या पिकाला जास्त पाऊस झाला तर कपाशीचे पिक पिवळे होऊन धोक्यात आली असुन ही पिके पिवळी पडत आहे जालना तालुक्यातील मौजे बीबी येथील शेतकर्यांच्या शेतात जाऊन पिकांची पाहणी करुन.जालना जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर झाला पाहीजे अशी शासनाकडे मागणी करताना भा.ज.पा.चे जालना जिल्हाउपाध्यक्ष, ज्ञानेश्वर {माऊली} शेजुळ, सोबत भाजपा महिला आघाडीच्या जालना जिल्हाध्यक्षा, श्रीमती जिजाबाई जाधव,जालना पंचायत समितीचे सदस्य, दिलीपराव पवार, सावरगाव भागडे_बीबीचे सरपंच प्र.अच्युतराव अंभुरे,मा.सरपंच, डिगांबर काकडे,मा.चेअरमन,गोविंदराव काकडे, सेवलीचे मा.सरपंच,मदनराव काळे,मा.उपसरपंच, बाबासाहेब भागडे, पाष्ट्याचे प्रभाकर गाढवे,सेवलीचे शिवराज तळेकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.