जालना तालुका
काढणीला आलेल्या गव्हाच्या पिकाला धोका
ढगाळ वातावरणामुळे शेतकर्यांची गहु काढणीसाठी लगबग सुरू
सिंधीकाळेगाव(प्रतिनिधी)
या आठवड्यामध्ये वातावरणात बदल झाला असुन, काही भागात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. काढणीस आलेला गहु, हरभरा पिकाचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकर्यांची चिंता वाढली आहे.जालना तालुक्यातील सिंधीकाळेगाव परिसरातील गहु काढणिला आलेला आहे. मजुर गहु काढणी करत नसल्याने सर्वच शेतकरी हार्वेस्टर मशीनच्या साहय्याने गहु काढणी करत आहे.
हार्वेस्टर चालक कमी शेत असतांना जास्त पैसे घेत आहेत. परंतु पैसे शिल्लक गेले तर गेले परंतु पिक काढणी व्हायला पाहिजे असे शेतकरी रामेश्वर गिराम यांनी सांगितले.अवकाळी पावसाचे गारपिटीने नुकसान होते की काय शेतकर्यांना चिंता लागली आहे. नुकताच हवामान खात्याने अवकाळी पाऊस व गारपिटीचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हातचा जोतो की काय अशी चिंता शेतकर्यांना लागली आहे.