विनाकारण फिरणा-यांना चोप तर अत्यावशक सेवेत नसणा-या दुकाणदारांना दंड.
बबनराव वाघ, उपसंपादक
जालना जिल्ह्यात कोरोनाने महाकालाचे उग्ररुप धारण केले आहे तर पोलिस प्रशासन नियमांचे पालन व्हावे या साठी रात्रंदिवस झटत असुन जनता माञ मदमस्त हाथी सारखी आपल्याच धुंदीत वावरत आहे.सोमवारी सकाळी जालना शहरात नागरीकांनी खुपच गर्दी केली होती, अशा विनाकारण फिरणा-या लोकांना चांगलाच चोप दिला. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली नागरीक कोरोनाचे नियम धाब्यावर टांगुन रस्तावर फिरतांना दिसत होते,
अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली बरीच दुकाने ऊघडी होती,ही बाब सदर बाजार पोलिस निरिक्षक संजय देशमुख यांच्या लक्षात येताच त्यांनी सिंधी बाजारा मधे पथसंचालन करत विनाकारण गर्दी करणारांना हटवुन जी दुकानें अत्यावशक सेवेत येत नाहीत अशा दुकान मालकांवर दंडात्मक कारवाई करीत बंद करायला लावली,आणि पुन्हा कायदा व सुव्यवस्थेचे नियम तोडलीत आपली गय केली जाणार नाही अशी ताकीद ही दिली,यावेळी पोलीस निरीक्षक संजय देशमुख सह उप निरीक्षक गणेश झलवार आणि जवळ जवळ पन्नास पोलिसांचा फौज फाटा सदर कारवाईत हजर होता.जनतेने पोलीसांना मदत करुन कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावे असे आवाहन संजय देशमुख यांनी केले.