आपलं गाव आपली जबाबदारी या माध्यमातून होणार कोरोना हद्दपार : सरपंच अमोल जाधव
विरेगाव येथे ग्राम दक्षता समिती स्थापन!
सिंधीकाळेगाव /प्रतिनिधी
देश भरात कोविड ने मोठ्या प्रमाणात धुमाकुळ घातला असुन याला रोखण्यास सुरुवात केली आहे त्यामध्ये ग्रामीण भागात तर मोठ्या प्रमाणात थैमान घालत आहे गावागावात कोविड आपले रौद्ररूप धारण करत आहे, त्याच बरोबर रुग्णांचा मृत्यूदर ही वाढत आहे आपलं गाव आपली जबाबदारी क्षमतेने पण माझे कुटुंब माझी जबाबदारी या नात्याने स्वतःबरोबर आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन केले.
आपल्या गावातील कोविड सदृश्य परिस्थिती रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून या उपक्रमासाठी मा. जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जालना यांच्या पत्रकाद्वारे विरेगाव येथे ग्राम दक्षता समिती स्थापन करण्यात आली .समितीचे अध्यक्ष सरपंच श्री अमोल जाधव, सचिव ग्रामसेवीका एस.डी.साबळे, मुख्याध्यापक- श्री एस.आर.खरात , कृषि सहाय्यक-श्रीमती रंजना सोनवलकर,पोलीस पाटील के.एस.गुंजाळ,
तलाठी श्रीमती लांडगे,शिक्षक एस.एस.बागल, बि.एल.ओ खडेकर, अंगणवाडी सेविका- श्रीमती शारदा पटेकर,कृ.उ.बा.सदस्य बाबुराव खरात,गट शिक्षण अधिकारी भगवान मोठे,मां.पं.स.सदस्य गणेश कदम,
कृ.उ.बा.सदस्य तारामती मोठे ,ग्रापंचायत सदस्य गणेश शिंदे,ग्रां.प.सदस्य, सुरेश जाधव , सुखदेव जाधव ,उप सरपंच सुनिल चव्हान, आर्चना इंगळे, शिवाजी लिखे, आशा कार्यकर्ता संगिता गायके ,डि.पी.मोठे, यांच्या माध्यमातून प्रत्येक आशा कार्यकर्ती व अगंणवाडी सेविका यांना 80 कुटुंब देण्यात आले, व प्रत्येक व्यक्तीचे प्लस ऑक्सीमाईटर द्वारे ऑक्सीजन लेवल व थर्मल गण द्वारे तापमान चेक करण्यास सांगितले. इत्यादी प्रकारे योग्य विभागणी करून जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.
याप्रसंगी मार्गदर्शन पर सरपंच जाधव म्हणाले की कोरोना विषयी जनजागृती व मनातील भीती कमी करण महत्वाचं आहे. तसेच योग्य वेळी उपचार घेतला तर कोरोना आजारापासून व्यक्ती बरा होऊ शकतो, व्यक्तीने दुखणे अंगावर न काढता सर्दी, ताप, खोकला या सारखी लक्षने आढळल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा, नसता समितीला कळवावे तसेच RT-PCR तपासणी करून घ्यावी. याच बरोबर सर्व जनतेने कोविड नियमांचे तंतोतंत पालन करावे तसेच लसीकरण करून घेण्याचे सरपंच अमोल जाधव यांनी आवाहन केले,