जालना तालुक्यातील पाथ्रुड येथे 7 मे शुक्रवार रोजी मानेगाव उपकेंद्राअंतर्गत कोवीशिल्डचे लसीकरण करण्यात आले. यावेळी जनतेमधून लसीकरणाला चांगला प्रतीसाद मिळाला. आजपर्यंत लसीकरणाला जनतेतून होणा-या अफवांमुळे पाहिजे तसा प्रतीसाद मिळत नव्हता. परंतु नागरीक जागरुक झाल्याने लसीकरणाला स्वत: केंद्रा समोर गर्दी करीत होते.पाथ्रुड येथील ग्रामपंचायत मध्ये एकूण 130 लसींचा पुरवठा करण्यात आला होता, यापैकी 128 नागरीकांनी लसीकरणाचा लाभ घेतला.
लसीकरण मोहीमेला धनराज गायके,गयाबाई गायके सरपंच, कैलास लुंगाडे ग्रामसेवक, वंचीत मेहेत्रे ऑपरेटर, माथा गायके शिपाई, रजनीकांत खिल्लारे सहशिक्षक, प्रल्हाद किटाळे, डॉ अतुल बाबासाहेब साटेवाड वैद्यकिय अधिकारी मानेगाव, डॉ शुभम मगर समुदाय आरोग्य अधिकारी, डॉ दिनेश कुलकर्णी वैद्यकिय अधिकारी, आर एच सिलेवार आरोग्य सेवक,पाटील आरोग्य सेवक, आशा कार्यकर्त्या व अंगणवाडी कार्यकर्त्यानी यशस्विरीत्या पार पाडले.