पीरपिंपळगाव आरोग्य केंद्रात दिवसभरात तब्बल 413 नागरिकांचे लसीकरण
जालना : येथून जवळच असलेल्या पीरपिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण बुधवार दि. 06 रोजी लस उपलब्ध झाल्याने लस घेण्यासाठी नागरिकांनी सकाळीपासूनच केंद्रावर मोठी गर्दी केली होती. दिवसभरात प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचार्यांनी रेकॉर्ड ब्रेक लसीकरण करीत तब्बल 413 नागरिकांना लस दिली तर लसीचा साठा संपल्याने जवळपास 50-60 नागरीकांना माघारी जावे लागले.
सध्या कोरोनाने सगळीकडे थैमान घातले असून आरोग्य विभागाने हार न मानता कोरोनाशी दोन हात करण्यास सज्ज झाले असून जोमाने कामाला लागले आहे. या विषाणूपासून प्रत्येक कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी शासनाच्या वतीने कोविड प्रतिबंधक मोफत लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पीरपिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात गुरुवार (दि.6) रोजी रेकॉर्ड ब्रेक लसीकरण करीत सकाळी 10.30 ते लस संपेपर्यंत तब्बल 413 नागरिकांना प्रतिबंधक लस देण्यात आली.
पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात 45 वर्षापुढील नागरिकांना वैद्यकीय अधिकारी डॉ. मिर्झा बेग यांच्या मार्गदर्शनाखाली हे लसीकरण संपन्न झाले. या लसीकरणास ज्येष्ठ नागरिक व महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत शांततेत लसीकरण संपन्न झाले.
या केंद्राला कोविड लसीकरणासाठी तिसर्या वेळेस 420 लसीचा पुरवठा पुरविण्यात आला होता, परंतु लस संपल्याने कमीत कमी 50 ते 60 नागरिकांना लस न घेता माघारी जावे लागले. सध्या जिल्ह्यात कोविडची साथ मोठ्या प्रमाणात असून नागरिक अडचणीत आहेत. बेड, ऑक्सिजन व्हेंटिलेटर मिळविण्यासाठी रुग्णांचे नातेवाईक हतबल होतांना दिसत आहे. अशा अत्यंत बिकट परिस्थितीत लसीकरण हाच एकमात्र पर्याय दिसत आहे. लसीकरणाची सुरुवात झाल्यापासून अनेक लोकांच्या मनातील भीती व गैरसमजामूळे पहील्या वेळेस 26 नागरिकांनी लस टोचून घेतली होती. परंतु आता नागरिकांच्या मनातील कोविड प्रतिबंधक लसीविषयी असलेला गैरसमज दुर होतांना दिसत असुन दुसर्या फेरीत 294 तर दि. 06 रोजी तिसर्या वेळी तब्बल 413 नागरिकांनी लस टोचून घेतली. कोरोनापासून बचावासाठी लसीकरण हे प्रभावी साधन असल्याने लोकांना जास्तीत जास्त लसीकरण करून आपले व आपल्या परिवाराचे जीवन सुरक्षित करून घ्यावे. लस संपल्याने अनेकांना केंद्रावरून लस घेतल्याविना परत माघारी जावे लागले.
याची माहिती मी वरिष्ठांना देणार असुन आरोग्य केंद्रात लस आल्यावर पुन्हा लसीकरण मोहीम राबवण्यात येणार असून आरोग्य केंद्रार्गत येणार्या गावातील कोणीही लसीकरणापासुन वंचित राहणार नाही यांची परिपूर्ण दक्षता घेत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. मिर्झा बेग यांनी दिली.
या लसीकरणासाठी एमपीडब्ल्यु मच्छींद्र बदर, के. के. बोर्डे, कैलास हरकल, डिगांबर इंगळे, पी. के. जाधव, आरोग्य सेविका एस. के. कोल्हे, स्वाती माकोडे, भालतिलक सिस्टर, एल.एच.व्ही गिर्हे, वाहन चालक भिमराव म्हस्के, आशासेविका शारदा कांबळे, मिरा शेळके, लता जुंबड, शकुंतला खडके, वैशाली वैद्य, माया गायकवाड, शोभा सोनवणे, चंदनझीरा पोलीस कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.