जालना तालुका

अज्ञात ईसमा विरूध्द पिंपळाचे झाड तोडल्या प्रकरणी मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

बबनराव वाघ,उपसंपादक

images (60)
images (60)

जालना तालुक्यातील जळगाव (सोमनाथ) येथील जिल्हा परीषद शाळेसमोरील सुमारे वीस ते पंचविस वर्षातील पुर्वीचे पिंपळाचे झाड कुणी अज्ञात ईसमाने करवतीच्या साह्याने तोडून टाकल्याची घटना 14 मे शुक्रवार रोजी पहाटे पहाटे घडली.

जळगाव (सोमनाथ) येथील जुन्या जिल्हा प्राथमिक शाळे समोर जवळपास पंचविस वर्षा पुर्वीचे पिंपळाचे झाड होते. ते कुणी अज्ञात ईसमाने तोडले. 14 मे रोजी पहाटे पावना आठ वाजे दरम्याण जळगावचे पोलीस पाटील मल्लीकार्जुन तोडकर यांना रस्तयाने जात असताना बघीतले, तोडकर यांनी तात्काळ उपसरपंच सोनाजी उध्दव भुतेकर यांना फोनवरून माहीती दिली यावर उपसरपंच भुतेकर हे गावातील प्रल्हाद दांडाईत,मुरलीधर थेटे व बाबूराव ढोले यांच्या सोबत जावून घटनास्थळाची पाहनी केली व तात्काळ ग्रामसेवक अर्चना वाव्हुळे यांना कळविले. ग्रामसेवक वाव्हुळे यांनी घटनास्थळी पोहचुन मौजपुरी पोलीसांना माहीती दिली. माहीती मिळताच मौजपुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विलास मोरे हे आपले कर्मचारी नितीन मतकर, भरत मुंढे, सागर खैरे, होमगार्ड शिवाजी मोरे, मगर आदींसोबत घटनास्थळी पोहचुन घटनास्थळाचा पंचनामा केला.

उपसरपंच भुतेकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात ईसमा विरूध मौजपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मौजपुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विलास मोरे व ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांनी कापलेल्या झाडाच्या जागेवर नविन पिंपळाचे झाड लावले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!