विनाकारण फिरणा-यां 206 जनांची करण्यात आली एंटीजेन तपासनी
बबनराव वाघ, उपसंपादक
दि. 23 : जालना तालुक्यातील रामनगर येथे विनाकारण फिरणारांना आज बाहेर पडले महागात. प्रत्येकाला आज रामनगर येथील पोलीस चौकीसमोर कारला येथील शासकीय रुग्णालयाचे उपकेंद्रातील कर्मचारी व मौजपुरी पोलीसांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या एंटीजेन तपासणीला सामोरे जावे लागले आहे.
सध्या रुग्णांची संख्या जरी कमी होत असेल तरी कोरोनासारख्या महामारीचे गांभीर्य लक्षात घेवून जनतेने बाहेर पडने सहसा टाळायला हवे, परंतू बाहेर पडणारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. यालाच आळा घालण्यासाठी रामनगर येथे एंटीजेन तपासनी करण्यात आली. यात तब्बल 206 जणांची तपासनी करण्यात आली.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र कारला येथील डॉ रेहमानी, टेक्नीशियन किरण काळे, संजय गायकवाड, राजेंद्र पेम्बार्ती, उध्दव डांगे, मौजपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आर डी बिराजदार, पोकॉ अनील जाधव, चयनसींग नागलोत,एन व्ही खरात, होमगॉर्ड शिवाजी मगर, शुभम मगर, राजेंद्र मगर, संतोष ताजी, गाडेकर व सय्यद यांनी मोलाची कामगीरी पार पाडली