वीज कामगारांच्या राज्यव्यापी कामबंद आंदोलनाला रामनगर युनिटने काळ्या फिती लावूण पांठीबा दिला.
बबनराव वाघ, उपसंपादक
दि 24 : राज्यभरात सुरू असलेल्या वीज कर्मचारी , अभियंत्यांच्या संयुक्त कृती समितीने पुकारलेल्या कामबंद आंदोलनाला रामनगर युनिट जालना येथील वीज कर्मचाऱ्यांनी आज, दि. 24 मे रोजी काळ्या फिती लावून काम करत पाठिंबा दिला .
तिन्ही वीज कंपन्यांतील कायम , कंत्राटी , आऊटसोर्सिंग कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता अखंडित वीजपुरवठा देण्याचे काम करीत आहेत . तरीही शासनाने त्यांना फ्रंटलाइन वर्कर्सचा दर्जा दिलेला नाही . शासनाच्या कोणत्याही सुविधा दिल्या नाहीत . त्यामुळे आज आंदोलन करण्यात आले .
या आंदोलनात तात्यासाहेब सावंत, विठ्ठल कळकुंबे,कु. अश्विनी कपले , रामेश्वर गिरी, शंकर तरडे, विकास खिल्लारे,चरण राऊत,दत्ता गिराम, गणेश गायकवाड, वसंत सोनुने, बंडु आगलावे, विशाल ससाणे, अंशुमन बोंद्रे, यांनी काळ्या फिती लावून रामनगर युनिट येथे निषेध व्यक्त केला.