जांबसमर्थ येथील रस्त्यावर घाणीचे साम्राज्य
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
घनसावंगी तालुक्यातील श्रीक्षेत्र जांबसमर्थ येथील रस्त्यावर पहिल्याच पावसात नालीचे घाण पाणी रस्त्यावर आले असुन सर्वत्र दुर्गर्धीं पसरल्याने नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
जांब समर्थ येथील ग्रामपंचायत ते सर्व गलोगल्लीचे सांडपाणी हे खंडोबाच्या मंदिर जवळ येऊन डबके साचत असल्यामुळे या ठिकाणी तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.दरम्यान गावातील नागरिकांना ये- जा करण्यासाठी व लहान मुलांना तसेच मोटार सायकल, रिक्षा, पादचारी,व चारचाकी, अशा गाड्या येण्या साठी अडचण निर्माण होत आहे. व त्याच गल्लीत शेवटी खंडोबाचे मंदिर आहे. तेथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना रस्त्यात पाणी साचत असल्यामुळे भाविकांना दर्शना ला येण्यासाठी अडचण येत आहे. तसेच आजू बाजूला राहणारे व गावातील नागरिकांना येताना नाकाला रुमाल बांधून येवा लागते. येवढे गल्लीच खंडोबा मंदिर परिसर झाला आहे. त्यामुळे पावसाळा सुरुवात होण्यापूर्वीच येथील ग्रामपंचायतने गावातील सर्वच परिसर साफ सफाई करून घ्यावा अशी मागणी गावातील नागरिकांकडून होत आहे.