घनसावंगी तालुका

विरेगव्हाण तांडा येथे रस्त्याच्या कडेला दुतर्फा नाली नसल्याने ग्रामस्थ, वाहनचालकांची गैरसोय!

images (60)
images (60)

कुंभार पिंपळगाव/प्रतिनिधी

जालना व परभणी जिल्ह्याला जोडल्या जाणाऱ्या पाचोड ते आष्टी या राज्य महामार्गाचे रस्ता रूंदी करणाचे काम सुरु आहे.सदरील रस्ता हा विरेगव्हाण तांडा येथून जात आहे.संबंधीत विभागाकडून नालीचे काम करण्यात आलेले नाही.या गावाची लोकसंख्या दोन ते अडीच हजारांपेक्षा अधिक आहे.ग्रामपंचायतकडून नालीसाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला.परंतू वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कामाला दुजोरा दिलेला आहे. नालीचे काम होत नसल्याने ग्रामस्थ,वाहनचालक,पादचारी,यांना मोठी कसरत करावी लागत आहे. रस्त्यालगत राहणाऱ्या ग्रामस्थांच्या घरासमोर पाणी साचून तळ्याचे स्वरूप प्राप्त होत आहे. यामुळे दुर्गंधी पसरून नागरीकांना आरोग्याशी सामना करावा लागत आहे.याठिकाणी पावसाळापुर्वी नालीचे काम होणे गरजेचे होते. परंतु हे काम झालेले नाही.या ठिकाणी नाली कधी होणार?असा प्रश्न ग्रामस्थांना उद्धभवत आहे.

सध्या पाचोड अंबड घनसावंगी कुंभार पिंपळगाव मार्गे आष्टी राज्य महामार्गाचे काम मागील दिड वर्षापासून संथगतीने सुरु आहे.या रस्त्यावर वाहनांची नेहमीच रहदारी असते.सध्या एकेरी मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असून या ठिकाणी छोट मोठे अपघात घडत आहे.संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांचे या कामाकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
लोकप्रतिनिधीसह संबंधित वरिष्ठ प्रशासनाने याकडे लक्ष देऊन दुतर्फा नालीचे काम सुरु करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!