पाणंद रस्त्यासह मुख्य रस्त्यावरील पुलाचे काम करण्याची ग्रामस्थांची मागणी : शिवनगाव-कुं.पिंपळगाव रस्त्याचा प्रश्न कायम!

घनसावंगी प्रतिनिधी / नितिन राजे तौर
घनसावंगी तालुक्यातील शिवनगाव येथील मुख्य रस्त्याची समस्या गेल्या 10 ते 15 वर्षांपासून तशीच आहे,याच अनुषंगाने पालकमंत्री यांनी कुंभार पिंपळगाव ते शिवनगाव 15 किमी अंतराऐवजी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 1400 मीटर रस्त्याचे काम मंजुर करुन तोंडाला पाने पुसली मात्र हे काम किमान फाट्यापर्यंत करण्यासाठी ग्रामस्थांनी मागणी केली.यावेळी 1400 मीटर ऐवजी 2500 मीटर रस्ता करण्याचे आश्वासन देऊन कामाला सुरुवात झाली मात्र या रस्त्यावर 5 क्रॉसिंग पुल आहेत ते नव्याने केल्याशिवाय रस्त्याचे काम करून उपयोग नसुन रस्ता झाल्यावर पुलाचे काम करण्याची मंजुरी मिळाल्यास रस्त्याची तोडफोड होईल यामुळे या रस्त्याच्या कामासोबतच पुलाचे काम होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

तसेच शिवनगाव येथे ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून पाणंद रस्ते केले आहेत मात्र त्या रस्त्यावर खडीकरण नसल्याने व परिसरात ऊसाचे क्षेत्र जास्तीचे आहे यामुळे शेतात जाताना व ऊसाची वाहतूक व सध्या आडसाली ऊस लागवडीसाठी चिखलातून वाहणे जात नाहीत यामुळे शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांचे हाल होत असुन या पाणंद रस्त्यावर बैलगाडी देखील जात नाही यामुळे शिवनगाव ते उक्कडगाव, शिवनगाव ते भादली, शिवनगाव ते दलित वस्ती व शिवनगाव शिवारातील पाणंद रस्त्याचे खडीकरण करून शेतकऱ्यांच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा व शिवनगाव ते कुंभार पिंपळगाव रस्त्याचे झालेले हाल लक्षात घेता व रस्त्याचे राजकारण न करता हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्याची मागणी ग्रामस्थांनी मुख्यकार्यकारी अधिकारी,पालकमंत्री राजेश टोपे व जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
(प्रतिक्रिया)
सूर्यकांत तौर(माजी सरपंच)
शिवनगावसह गोदाकाठ परिसरातील कुंभार पिंपळगाव कडे जाणारे रस्ते हे पाणंद रस्ते झाले हे रस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करून शिवारातील पाणंद रस्त्यावर खडीकरण करून 1400 मीटर चे काम चालू असलेल्या रस्त्यावरील पुलाचे काम नव्याने करावे यामुळे ग्रामस्थांच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागेल….