बेपत्ता तलाठ्याचा शोध लागेना…
कामचुकार तलाठ्यावर कावाई करा; ग्रामपंचायतीचा ठराव
तहसिलदार यांच्याकडे तक्रार दाखल
जालना (प्रतिनिधी) ः मौजपुरी सज्जाचे तलाठी सुभाष जाधव हे गावात येत नसून शेतकर्यांची कामे करीत नाहीत. शेतकरी घरी आले तरी ते शेतकर्यांना भेटत नाहीत, कायमस्वरुपी दारुच्या नशेत असतात. त्यांचा असूनही काही उपयोग नाही यासह अनेक तक्रारीचा पाढा वाचत मौजपुरीच्या ग्रामस्थांसह ग्रामपंचायतीने ठराव घेत तलाठ्यावर कारवाई करण्याची मागणी केली. या सदंर्भातील तक्रार तहसिलदार यांच्याकडे दाखल करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यापुर्वी शेतकरी संघटनेने मौजपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करुन तलाठी हरवल्याची तक्रार नोंदवली होती, त्याचा आजपर्यंत शोध लागला नाही. अशा संतप्त प्रतिक्रिया नागरीक देत आहेत.
2020-21 मध्ये ग्रामपंचायतीच्या सार्वत्रीक निवडणूकीच्या अधिपासून मौजपुरीचे तलाठा गावात येत नाहीत. अनेकवेळा विनंत्या, तोंडी तक्रारी करुन देखील तलाठी गावात येत नाहीत. विशेष म्हणजे काही महिन्यापुर्वीच शेतकरी संघटनेने मौजपुरी पोलीस ठाण्यात तक्रार देऊन मौजपुरी सज्जाचे तलाठी हरवल्याचे म्हटले होते. तेंव्हापासून तलाठी गावात येतील अशी अपेक्षा होती, परंतु त्या तक्रारीनंतर तलाठ्यावर कोणताही परिणाम झालेला नाही. ग्रामपंचायत निवडणूका, कोरोना नियोजनासाठी ग्रामदक्षता समिती गठीत करण्यात आलेली असतांना व जिल्हाधिकारी यांचे आदेश असतांनाही तलाठी गावात चमकले सुध्दा नाहीत. शेतकर्यांची कामे करण्यासाठी तलाठी नियुक्त असतांना व नियमित महिन्याला पगार घेत असतांनाही तलाठी गावात येत नसेल तर त्याला पगार तरी कशाचा मिळतो, आणि सरकार त्यांना पगार का देते असा सवाल मौजपुरी ग्रामपंचायतीने केला आहे.
या प्रकरणी तात्काळ कारवाई करुन तलाठी यांच्याकडून मौजपुरी सज्जा काढून घ्यावा व तीथे नव्या तलाठ्याची नियुक्ती करावी अन्यथा गावाला तलाठीच नको असा ठराव ग्रामपंचायतीने घेतला आहे. यावेळी सरपंच सौ. ज्योतीताई भागवत राऊत, उपसरपंच आप्पासाहेब डोंगरे, बद्रीनारायण भसांडे, सत्यनारायण ढोकळे, सविता राम जाधव, मिरा नारायण गायकवाड, लता बंडू काळे, संतोष मोरे, मनिषा विष्णू डोंगरे, बंडूभाऊ डोंगरे, बालाजी बळप, अच्यतु मोरे, अंकुश काळे, बाळु गायकवाड, निवृत्ती जाधव, भागवत राऊत, कृष्णा हिवाळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.