जालना तालुका
जालना शहरातील पानीवेस परीसरात वाहतुकीची कोंडी.
बबनराव वाघ, उपसंपादक
जालना शहरात वाहतुकीची कोंडी दिवसें दिवस वाढतच चालली असुन शहरात येणा-ंयाची संख्या वाढतच चालली आहे. कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये शहरात येणा-या जाणा-यांची गर्दीच होत नव्हती.
लॉकडाऊनमध्ये सुट मिळाल्यापासुन शहरात येणा-यांची संख्या अवाक्याबाहेर वाढली आहे. लोकांना सामाजीक दुरीचे भान तर सोडाच पन कोरोनाची भिती देखील राहीली नाही. अशात शहरातील पानीवेस ही लहान तोंडाची असल्यामुळे एका वेळी एकच गाडी बाहेर पडू शकते, परंतु लोकांना संयम नसल्याने वाहतुक चारही बाजुन एकाच वेळी बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात व वाहतुक तासनतास एकाच ठिकाणी अडकून पडते. यातच वाहतुक शाखेचे कर्मचारी नसेल तर मग वाहतुक ठप्पच होणार. वाहतुक शाखेने याकडे गांभीर्याने लक्षात द्यायला पाहिजे.